- प्रज्ञा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निपुण भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या ‘दिशा’ प्रकल्पामुळे ७० हजार ५०४ पैकी ६७ हजारांहून अधिक मुलांना मराठी लिहिता, वाचता येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना काहीच वाचता लिहिता येत नव्हते ती मुलेही या प्रकल्पामुळे प्रगती करू शकली, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
‘निपुण’मध्ये इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना ४५ शब्द सलग प्रतिमिनिट आणि तिसरीत गेलेल्या विद्यार्थ्याला ६० शब्द प्रतिमिनिट वाचता आले पाहिजे, असे अपेक्षित आहे. मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या १३०७ शाळा असून, त्यात ७० हजार ५०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिशा प्रकल्प सुरू झाल्यावर तब्बल १३.७७ टक्के विद्यार्थ्यांना केवळ अक्षर वाचन करता येत होते. त्यात घट होऊन तो आकडा आता ५.९७ टक्क्यांवर येऊन उर्वरित विद्यार्थ्यांची पुढच्या वाचन टप्प्यावर प्रगती झाली आहे. आला आहे. त्याचप्रमाणे केवळ शब्द वाचणाऱ्यांचे प्रमाणही अशाच पद्धतीने कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे वाक्य, परिच्छेद आणि गोष्ट वाचणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. यंदा ७० हजार ५०४ पैकी ६७ हजार ५५० मुलांना मराठी वाचन करता येऊ लागले आहे. मातृभाषेतील श्रुत लेखनातही अशाच पद्धतीने प्रगती झाल्याने ६७ हजार २६१ विद्यार्थ्यांना आता मातृभाषेत ऐकून लिहिता येऊ लागले आहे.
गेल्या वर्षी ५८ हजार ०४६ विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत होती. यावर्षी ही संख्या ६७ हजार ५५० विद्यार्थ्यांवर पोहोचली.
वाचन मागील या प्रकार वर्षी वर्षी अक्षर वाचन १३.७७ ५.९७शब्द वाचन १६.९१ १३.११वाक्य वाचन १५.२५ १६.८१परिच्छेद वाचन १५.०४ १८.४५गोष्ट वाचन २१.३६ ४१.४७
लेखन मागील या प्रकार वर्षी वर्षी अक्षर लेखन १६.२५ ८.४९ शब्द लेखन २१.९७ १८.८७वाक्य लेखन १८.३१ २१.२८परिच्छेद लेखन १२.४१ १९.१९ गोष्ट लेखन ११.३१ २७.५७