शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठी बोला’ चळवळीने जोडले ७० नवे कार्यकर्ते

By admin | Updated: February 5, 2017 03:14 IST

केंद्र शासनाची धोरणे हिंदीधार्जिणी आहेत. त्यांचा इतर भारतीय भाषांनादेखील धोका आहे. मराठी भाषेची होणारी गळचेपी पाहून तिला मानाचे स्थान मिळावे, यासाठी ‘मराठी बोला’ चळवळीने

- जान्हवी मोर्ये,  पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

केंद्र शासनाची धोरणे हिंदीधार्जिणी आहेत. त्यांचा इतर भारतीय भाषांनादेखील धोका आहे. मराठी भाषेची होणारी गळचेपी पाहून तिला मानाचे स्थान मिळावे, यासाठी ‘मराठी बोला’ चळवळीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनात मराठी बोला चळवळीने पहिल्यांदाच स्टॉल लावला आहे. साहित्य संमेलनातून ‘मराठी बोला’ चळवळीची माहिती मिळाल्याने आता ६० ते ७० लोक या चळवळीशी जोडले जाणार आहेत. विशाल नवेकर आणि प्रसन्न कुलकर्णी यांनी मराठीची गळचेपी होत असल्याची आणि मराठीला स्वतंत्र स्थान दिले जात नाही, हे लक्षात आल्यावर २००२ मध्ये ‘मराठी बोला’ चळवळीचा प्रारंभ केला. त्यानंतर, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे धनराज पवार यांनी फेसबुकवर एक ग्रुप तयार केला. त्याला लाइक जास्त मिळाले. त्याची सदस्यसंख्या वाढत आहे. त्यातून याची चळवळ उदयास आली. या चळवळीच्या माध्यमातून कौशिक लेले यांनी इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी युनिकोडिंग सुरू केले. या उपक्रमांतर्गत लोकांना भाषांतर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून लोकांचे गट तयार केले आहेत. इतर भाषिक साहित्य मराठी भाषेत आणण्यासाठी त्यांच्यामार्फत प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यांचा वापर शोध निबंध भाषांतरित करण्यासाठी होऊ शकतो. या चळवळीचा सर्व कारभार फेसबुक व टिष्ट्वटर यांच्यामार्फत चालतो. मराठीची गळचेपी होत आहे, हे लक्षात आल्यावर त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याचे काम चळवळीमार्फत केले जाते. त्यामुळे नया अमरावती या शहराचे नाव बदलून नवीन अमरावती, नेरूळचे नेरूळ, तर ब्रांदाचे वांद्रे असे नामकरण केले आहे. कौशिक लेले यांनी अमराठी आणि परदेशी नागरिकांना मराठी शिकवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी दोन ब्लॉग तयार केले आहेत. हे काम त्यांनी २ वर्षांपासून सुरू केले आहे. या माध्यमातून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त विदेशी नागरिक मराठी बोलू लागले आहेत. कोणत्याही शिक्षकांविना हे अमराठी नागरिक उत्तम मराठी बोलू लागले आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य दिले जाते.