ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 3 - मराठी आणि हिंदीत काहीही व्यवधान नाही.त्या भाषा एकमेकींच्या बहिणी आहेत, असे हिंदी कवी विष्णू खरे म्हणाले. 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धाटन प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले.
"मुख्यमंत्रयांनी मराठी भाषा ही जगतभाषा विकासाची अकॅडमी स्थापन केली, पाहिजे, ते केवल महाराष्ट्र शासन करू शकते, विदेशात मराठी लोप पावली आहे.मराठी साहित्य विश्व स्तरावर न्यायची असल्यास काही निर्णय घ्यावे लागतील."असे ते म्हणाले.
हिंदीत चांगले अनुवादक नाहीत. हिंदीचा स्टॉल आहे का असे विचारत त्यांनी भाषेचं आदान प्रदान करावंच लागेल, असेही सांगितले. जर तुम्ही वाचक आहेत , पुस्तक खरेदी करतात तर त्याच संरक्षण करणे ही सगळ्याची जबाबदारी आहे. असेही ते म्हणाले.