शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

मनोरुग्णालयावर अनेकांचा डोळा

By admin | Updated: July 16, 2016 01:46 IST

रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी मेंटल हॉस्पिटलची जागा मिळावी, असा वाद सुरू असतानाच याच मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील १० एकर जागा मिळा

पंकज रोडेकर,  ठाणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी मेंटल हॉस्पिटलची जागा मिळावी, असा वाद सुरू असतानाच याच मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील १० एकर जागा मिळावी म्हणून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचाली शासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयास ५४१ बेडला मंजुरी दिल्यानंतर सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ती जागा मिळत नसेल तर, अन्यथा दुसरा पर्यायही रुग्णालय प्रशासनाने डोळ्यांसमोर ठेवला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले विठ्ठल सायन्ना रुग्णालय हे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणून ओळखले जाते. ते सध्या ३३२ बेडचे आहे. वेगवेगळ्या चार इमारतींमध्ये त्याचा कारभार सुरू आहे. याचदरम्यान, शहरी आणि ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय ५४१ बेडचे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याला शासनस्तरावर मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे सुपरस्पेशालिटी आणि जिल्हा शासकीय रुग्णालय उभारण्यासाठी मोठ्या जागेची गरज लक्षात घेऊनच मेंटल हॉस्पिटलमधील १० एकर जागा मिळावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने केली आहे. जर ही जागा मिळत नसेल तर सध्याचे उभे असलेले रुग्णालय आणि परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह पाडून त्या जागेत टोलेजंग इमारतींचे बांधकाम करावे लागणार आहे.