शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेसाठी एक्स्प्रेसमध्ये चढला आणि पोहोचला कल्याणला; पोलिसांमुळे गुलाबवाडीचा मनोज परतला घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 09:08 IST

त्रोटक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांमध्येच त्याच्या पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

ठाणे : आपल्या मित्रांसमवेत खेळताना केवळ लघुशंकेसाठी एक्स्प्रेसमध्ये चढलेल्या नाशिकच्या गुलाबवाडीतील  नऊ वर्षीय मनोज हा ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटमुळे सुखरूप स्वगृही परतला आहे. त्रोटक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांमध्येच त्याच्या पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मंगळवारी दिली.उल्हासनगर येथील शासकीय मुलांच्या बालसुधारगृहाला ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने २१ मार्च रोजी सकाळी भेट दिली. तेव्हा २० मार्च रोजी नऊ वर्षीय मनोज नामक मुलगा आपल्या संस्थेत दाखल झाला असून तो नाशिक येथे वास्तव्याला आहे. तसेच त्याला पूर्ण पत्ता सांगता येत नसल्याची माहिती  या बालसुधारगृहाचे समुपदेशक तथा प्रभारी अधिकारी संतोष  खोपडे यांनी दिली. त्यानुसार या युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हितगुज करून त्याचा विश्वास संपादन केला. तो वास्तव्याला असलेल्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय तसेच अण्णाचे दुकान इतकीच त्रोटक माहिती त्याने दिली. तो नाशिकच्या गुलाबवाडी भागात वास्तव्याला असल्याचीही माहिती समोर आली. मनोज शंकर जाधव असे आपले पूर्ण नाव त्याने सांगितले. त्याचआधारे  नाशिक रोड पोलीस ठाण्यांतर्गत हा गुलाबवाडीचा भाग येताे. याच भागातून ताे बेपत्ता झाला असून  त्याचे वडील शंकर जाधव यांचे निधन झाल्याचेही चौकशीत या पथकाला समजले. त्याची आई कल्पना जाधव  यांचा मोबाईल क्रमांक मिळवून पोलीस हवालदार चौधरी यांनी त्यांच्या मोबाईलद्वारे व्हिडीओ कॉल करून मनोज आणि त्याच्या आईशी बातचीत करून दिली. दोघांनी एकमेकांची ओळख पटविल्यानंतर  गुलाबवाडीतील हा पत्ताही शोधून त्याला बालकल्याण समितीच्या मदतीने आईच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.