शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

------------------------- रुग्णालयात चोरी कल्याण : जोगेश्वरी येथे राहणारे प्रवीण परब यांची आई सुरेखा या येथील शिवाजी चौकातील शेलार रुग्णालयात ...

-------------------------

रुग्णालयात चोरी

कल्याण : जोगेश्वरी येथे राहणारे प्रवीण परब यांची आई सुरेखा या येथील शिवाजी चौकातील शेलार रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. सोमवारी (दि. २३) मध्यरात्री त्यांच्या आईच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची मणी माळ चोरीला गेली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २४) सकाळी ११.४५ सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------

दुचाकी चोरी

कल्याण : पूर्वेतील संतोषनगरमध्ये राहणारे राजेश कुबल यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या शिवमंगल अपार्टमेंटमध्ये पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------

मोबाइल चोरी

कल्याण : लक्ष्मण भोसले हे बुधवारी (दि. २५) रात्री १०.३० ला सूचक नाका सर्कल येथे गणेश मंदिराजवळून जात असताना त्यांच्या हातातील मोबाइल चोरट्याने खेचून पलायन केले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------------

भाऊबहीण जखमी

कल्याण : आंबिवली येथे राहणारा रोहित जाधव हा बहीण रसिकासह दुचाकीने आंबिवली येथे जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या अन्य एका दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रोहित आणि रसिका गाडीवरून खाली कोसळले. यात त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीचालकाविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

---------------------------------------

पत्नी, मेहुण्यावर वार

डोंबिवली : नवरा मारझोड करतो म्हणून मुलांना घेऊन भावाकडे येऊन राहिलेल्या पत्नीवर आणि तिच्या भावावर ब्लेडने वार करून स्वत:लाही त्याच ब्लेडने जखमी करून घेतल्याची घटना पूर्वेतील आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टीत बुधवारी रात्री नऊ वाजता घडली. विशाल डोंगरे असे वार करणाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरोधात रामनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पत्नी रंजना आणि तिचा भाऊ अजय साळवे हे दोघे ब्लेडच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

---------------------------------------

पार्सल बॅग चोरीला

डोंबिवली : सतीश जाधव हे ठाकुर्लीतील ९० फुटी रोडवरील अंबर हार्माेनी या सोसायटीत ग्राहकाला पार्सल देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी इमारतीच्या मेन गेटजवळील वॉचमनच्या केबिनबाहेर त्यांची बॅग ठेवली होती. त्यांतील १४ हजार ४८० रुपयांच्या अन्य पार्सल बॅग चोरीला गेल्याची घटना बुधवारी सकाळी ११.४५ ते १२ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांत जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे.

------------------------

कोरोनाचे ५६ रुग्ण

कल्याण : केडीएमसी हद्दीत शुक्रवारी नवीन ५६ कोरोना रुग्णांची भर पडली आहे; तर, उपचाराअंती २४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ५७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीत एक लाख ३७ हजार ३८२ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

---------------------