शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मनसे शहराध्यक्षांचे एकला चलो रे?

By admin | Updated: April 26, 2017 23:49 IST

केडीएमसीच्या क्रीडासंकुलातील तरणतलाव आणि शिवाजी उद्यानातील तीन वर्षांपासून बंद असलेली मोराची गाडी सुरू व्हावी

डोंबिवली : केडीएमसीच्या क्रीडासंकुलातील तरणतलाव आणि शिवाजी उद्यानातील तीन वर्षांपासून बंद असलेली मोराची गाडी सुरू व्हावी, यासाठी मनसेने आक्रमक होत आंदोलने केली. त्याचबरोबर रेल्वे स्थानकातील मधल्या पादचारी पुलाखालील कचऱ्याला लागलेल्या आगीची दखल घेत रेल्वे स्थानक प्रबंधकांची भेट घेतली. मात्र, या सर्व प्रकारांत पक्षातील निवडक पदाधिकारीच सहभागी झाले होते. नगरसेवक व कार्यकर्त्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याची सर्वत्र चर्चा होती. त्यामुळे शहराध्यक्ष मनोज घरत यांची ‘एकला चलो रे’ भूमिका सुरू आहे, अशी कुजबूज पक्षातील कार्यकर्त्यांत आहे.आयत्या वेळेवर ठरवून आंदोलने केली जातात का, असा नाराजीचा सूर कार्यकर्त्यांमध्ये होता. कौटुंबिक उपक्रम तसेच वाहतूककोंडीमुळे आंदोलनात सहभागी होता आले नाही, अशी सबब काही नगरसेवकांनी दिली. ऐनवेळी व्हॉट्सअ‍ॅपवर उपक्रम कळवले जातात. त्यामुळे तातडीने त्यात सहभागी होता येत नाही. नियोजनाशिवाय आंदोलने यशस्वी कशी होतील, असा सवाल त्यांनी विचारला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे यशस्वी होण्यामागे नियोजन आणि आखणीबद्ध कार्यक्रम हे महत्त्वाचे असते. तसे नियोजन येथील आंदोलनांमध्ये का दिसत नाही? बहुतांशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आंदोलन झाल्यावर व्हॉट्सअ‍ॅपवरील फोटो तसेच सोशल मीडियावरील चर्चेमुळे माहिती मिळत असल्याचेही कार्यकर्ते म्हणाले.केडीएमसीत मनसेचे १० नगरसेवक आहेत. कार्यकर्तेही मोजकेच उरले आहेत. पक्षाचे दोन मोठे पदाधिकारी येथे वास्तव्याला आहेत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रपणे एखादा विषय हाताळला, आंदोलने केली आणि त्यातून यश मिळाले, असे का दिसत नाही, अशीही कुजबूज पक्षात सुरू आहे. मध्यंतरी एका कार्यकर्त्याने संगीतावाडी परिसरात सुरू केलेल्या पक्षाच्या कार्यालयाचे थाटामाटात उद्घाटन झाले. त्यावेळी बहुतांशी सगळेजण उपस्थित होते, ती उपस्थिती नियोजनामुळे होती. पण, आठवडाभरातील आंदोलने, भेटीगाठीमध्ये मात्र ते नियोजन सपशेल ढासळल्याची खंत व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)