शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मिनी महाबळेश्वर टेकड्यांवर होणार मानवनिर्मित जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:34 IST

कृती आराखडा होत आहे तयार : उच्चस्तरीय समिती स्थापन

हुसेन मेमनलाेकमत न्यूज नेटवर्क जव्हार : मिनी महाबळेश्वर म्हणजेच जव्हार येथे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाैऱ्यात परिसरातील डाेंगर, टेकड्या उजाड झाल्याचे पाहून येथे मानवनिर्मित जंगल विकसित करण्यासाठी विशेष याेजना राबवण्याच्या सूचना केल्या हाेत्या. त्यानुसार उच्चस्तरीय समिती स्थापून विशेष कृती आराखडा तयार करणार असून, पर्यटन आणि वनविभागावर जबाबदारी साेपवली आहे. जव्हामध्ये ३५ टक्के वनविभागाची, तर उर्वरित खाजगी मालकीची जमीन आहे. यामध्ये उतारावरील जमीन वनविभागाकडे आहे. येथे असलेल्या वृक्षसंपदा पानगळ पद्धतीची आहे. या डोंगर-टेकड्यांवर मानवनिर्मित जंगल विकसित करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समितीमध्ये पालघरचे जिल्हाधिकारी, पाणीपुरवठा-स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव, जलसंधारण व रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव, मुख्य वनसंरक्षक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक, पर्यटन विभागाचे संचालक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव तसेच जल संपादन विभागाचे उपसचिव सदस्य आहेत. याबाबत मंत्रालय स्तरावर अलीकडेच बैठक पार पडली. 

या बैठकीत २०२१ चे अद्ययावत नकाशे देऊन जव्हार येथील पर्यटनाबाबत सर्वसमावेशक गोष्टींचा विचार करून आराखडा तयार करण्याची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तर वनविभागाकडे असलेल्या क्षेत्राचे तसेच खासगी क्षेत्रावर हरितपट्टे विकसित करण्याकामी सर्वसमावेशक आराखडा तयार करणे, सीडबॉल व सीडब्लास्टिंग पद्धतीने कृत्रिम जंगल (वन) तयार करण्यासाठी वनविभागावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुक्यात पर्यटन, जलसंपदा, कृषी, रोजगार हमी योजना इ. विभागांच्‍या प्रयत्नाने शाश्वत पर्यटन आराखडा करण्याची जबाबदारी विविध विभागांवर दिली. 

३६० हेक्‍टर क्षेत्रावर बांबू लागवडया योनजेंतर्गत सुमारे ३६० हेक्‍टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून खाजगी मालकीच्या टेकड्यांवर ब्लॉक प्लांटेशन उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. ३१ प्रजातींच्या फळझाडे लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहे. १९ हजार वनपट्टेधारकांकडे १० हजार ७०० हेक्‍टर जमीन असून, त्यात फळझाडे लागवडीसाठी या योजनेला रो.ह.योजनेची जोड देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान