शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील खाडीकिनाऱ्याची खारफुटी काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:02 IST

मँग्रोव्ह मॉथ कॅटरपिल्लरचा प्रादुर्भाव : वातावरणबदलाचा परिणाम

- पंकज रोडेकर

ठाणे : खाडीकिनाºयाची खारफुटी दिवसेंदिवस नष्ट होत असून त्या ठिकाणी येणाºया पक्ष्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. तेथे पक्ष्यांसाठी तयार होणाºया खाद्यपदार्थांचे प्रमाण मुबलक आहे. पण, तेथे वृक्षतोडीमुळे पक्षी येत नाहीत. त्यामुळे मॅँग्रोव्ह मॉथ या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने ठाणे खाडीकिनाºयाची खारफुटी सद्य:स्थितीत काळवंडू लागली आहे. हा परिणाम वातावरणातील बदलाचा असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशाच प्रकारातून नवी मुंबईतील सीवूड परिसरात खारफुटी सोडून अन्य वृक्षांवर बसलेल्या सुरवंटांनी रस्त्यावरील वाहनचालकांवर हल्ला केल्याचा अंदाज आहे.

ठाण्याला कोपरीपासून कळवा, बाळकुम ते थेट गायमुख असा खाडीकिनारा लाभला आहे. यातील कोपरी आणि कळवा परिसरात असलेल्या खाडीकिनाºयाची खारफुटीची झाडे मोठ्या प्रमाणात काळवंडण्यास सुरुवात झाली आहे. आॅक्टोबर महिना हा हीटचा म्हटला जात असला, तरी या किनाºयावरची खारफुटीची झाडे ही वेगळ्या कारणांनी काळवंडली आहे. या झाडांवर मँग्रोव्ह मॉथ कॅटरपिल्लर या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने खाडीच्या एका टोकापासून दुसºया टोकाकडे पाहिल्यावर झाडे काळवंडल्याचे दिसत आहे. या अळ्या प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यात येतात. मात्र, यंदा त्या आॅक्टोबर महिन्यात आल्याने खारफुटीची झाडे काळवंडली आहेत. त्या प्रामुख्याने झाडांच्या पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे ही झाडे काळवंडली आहेत. हा प्रादुर्भाव पाहून झाडेच आपली पाने गाळण्यास सुरुवात करतात. या अळ्या हळूहळू खाडीकिनाºयाच्या इतर झाडांवर दिसून येत आहेत. मानवी वस्तीत झाडांवर हवेत तरंगताना त्या लोकांच्या अंगावर पडतात. ती चावल्यास अंगावर चट्टे उठतात. त्यामुळे नागरिकांनी तेथे जाणे टाळावे, अथवा अंगभर कपडे परिधान करावेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

ही अळी लष्करी अळीसारखीचशेतात येणाºया लष्करी अळीप्रमाणेच मँग्रोव्ह मॉथ कॅटरपिल्लर ही अळी प्रामुख्याने झाडांच्या पानांवर हल्ला करते. त्यामुळे झाडाची पाने सुकतात. हळुहळु झाडाची पानेही गळू लागतात. मात्र अळींचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर झाडांना लगेचच नवीन पालवी फुटते. 

हा प्रकार गंभीर आहे. याला आपणच सर्वजण जबाबदार आहोत. वातावरणात सातत्याने होणाºया बदलामुळे हा प्रकार वाढल्याचे दिसत आहे. या अळ्या प्रामुख्याने पावसाळ्यात येतात. पावसाबरोबर त्या झाडांवरून जमिनीवर पडल्यावर त्यांचे सुरवंट होते. त्यांचे कोष निर्माण झाल्यावर ते फुलपाखरू होते. एखाद्या जीवनसाखळीतील एक घटक कमी झाल्यावर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे त्याचा परिणाम सध्या दिसत आहे.- डॉ. नागेश टेकाळे, पर्यावरणतज्ज्ञ