शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तबदलाची नोंद गिनीज बुकमध्ये करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 03:18 IST

पवार यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी नेत्यांचे हितसंबंध दुखावल्याची शिक्षा त्यांना केल्याचा आरोप त्यांनी केला.

भार्इंदर : राज्यातील भाजपा सत्ताकाळात चार वर्षांत चार आयुक्त, त्यांचा कार्यकाळ पूर्ण न करताच बदलल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली.यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांची शहरात येजा होत नसली, तरी शहराचा विकास मात्र होत होता. परंतु, भाजपाच्या सत्ताकाळात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहरात सतत राबता असल्याने त्यांचे शहराकडे अधिकच बारीक लक्ष असल्याचा टोला सावंत यांनी लगावला. तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या बदलीसाठी भाजपा लोकप्रतिनिधींनी आपली कार्यालये बंद ठेवून जनतेला वेठीस धरले होते. त्यानंतर, आयुक्तापदावर विराजमान झालेल्या बळीराम पवार यांची तर अवघ्या दोन महिन्यांतच उचलबांगडी करण्यात आली. पवार यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी नेत्यांचे हितसंबंध दुखावल्याची शिक्षा त्यांना केल्याचा आरोप त्यांनी केला. असे सुडाचे राजकारण करणाऱ्या सत्ताधाºयांनी पालिकेत आयुक्त नियुक्त न करता स्वत:च प्रशासन चालवावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी भाजपाला दिला.रखडलेला उत्तन घनकचरा प्रकल्प, तीव्र पाणीटंचाई, ठप्प झालेली विकासकामे, कोलमडलेली परिवहनसेवा, पालिका शाळांची दुरवस्था, वाढलेली अनधिकृत बांधकामे, रद्द झालेला विकास आराखडा, रेंगाळलेली पंतप्रधान आवास योजना, अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या आदी प्रश्नांमुळे शहरातील जनता त्रस्त असताना क्षुल्लक कारणास्तव आयुक्त बदलणे हा जनतेवर अन्याय आहे, असे सावंत म्हणाले. भाजपाच्या सत्ताकाळात गेल्या चार वर्षांत चार आयुक्तांचा राजकीय बळी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला....तर रस्त्यावर उतरणारशहराच्या विकासाकरिता स्थानिक नेत्याच्या मर्जीतील नव्हे तर एक सक्षम आयुक्त मुख्यमंत्र्यांनी द्यावा. सरकारने या गोंधळात लक्ष घातले नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून भाजपाच्या प्रशासकीय कारभारातील हस्तक्षेपाचा तीव्र विरोध करील.

टॅग्स :commissionerआयुक्त