शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आगाऊ कर भरा, सवलत मिळवा

By admin | Updated: April 26, 2017 23:56 IST

विविध करांची वसुली वेळेत करण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या

ठाणे : विविध करांची वसुली वेळेत करण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ताकराची बिले छापून तयार झाली असून २ मे पासून ती मालमत्ताधारकांच्या हाती पडणार आहेत. जे मालमत्ताधारक चालू वर्षाचे बिल आगाऊ भरतील, त्यांना मालमत्ताकरात १० टक्के सवलत मिळणार आहे. महापालिकेने मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०१६-१७ मध्ये विविध करांच्या स्वरूपात १८१६ कोटींची वसुली केली आहे. यामध्ये मालमत्ताकराची वसुली ३८०.५१ कोटी आहे. परंतु, लक्ष्यापेक्षा ती कमीच असल्याचे दिसून आले आहे. याची कारणेदेखील अनेक आहेत. काही वेळेस मालमत्ताधारकांच्या हाती बिले न पडणे, थकबाकी नसताना ती दाखवणे, कर्मचाऱ्यांची कमतरता ही कारणे यामागे आहेत. यावर उपाय काढण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार, वेळेआधीच मालमत्ताधारकांच्या हाती बिले देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही बिले छापून तयार झाली होती. यंदा मात्र एप्रिलअखेरच ती छापून तयार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालमत्ताधारकांच्या हाती पडणार आहेत. यासाठी पालिकेचे कर्मचारी कामाला लागले आहेत. याशिवाय, आॅनलाइन बिलेदेखील तयार असल्याचा दावा मालमत्ताकर विभागाने केला आहे. महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना कराची बिले वेळेवर मिळावीत, यासाठी प्रशासनाने टपाल खात्याद्वारे कराची बिले पाठवण्यास सुरु वात केली होती. परंतु, अनेक मालमत्ताधारकांना ती वेळेवर मिळाली नव्हती. यापैकी काही मालमत्ताधारकांच्या घरी ती पोहोचलेली नसताना कराच्या थकबाकीसंबंधीच्या पाठवलेल्या नोटिसा मात्र घरपोच केल्या होत्या. त्यामुळे टपाल खात्यामार्फत करांची बिले पाठवण्याची योजना वादात सापडली होती. तसेच या योजनेवरून प्रशासनावर टीकेचा भडीमार होऊ लागला होता. (प्रतिनिधी)