शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १४ लाखाहून अधिकचा बनावट विदेशी मद्य व इतर मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 21:06 IST

- रणजीत इंगळे  ठाणे: राज्य उत्पादन शुल्क ठाणे आणि नवी मुंबई विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथील ठाणे बेलापूर रोडवर ...

- रणजीत इंगळे 

ठाणे: राज्य उत्पादन शुल्क ठाणे आणि नवी मुंबई विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथील ठाणे बेलापूर रोडवर बनावट विदेशी मद्याच्या वाहतुकीवर पाळत ठेऊन छापा टाकट तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १४ लाख ३५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्तमाहितीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे ५ वाजण्याच्या सुमारास भरारी पथक ठाणे विभाग, विभागीय भारती पथक ठाणे, निरीक्षक पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सापळा रचला. त्या दरम्यान त्यांनी एमएच ०२ बीक्यू ८०८३ वाहन अडवले. यावेळी गाडीची तपासणी केली असता, राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्या गाडीत बनावट विदेशी मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. सुनील वाघेला, उमेश दुबे आणि साहिल चौहान अशी ताब्यात घेतलेल्या तीन जणांची नावे आहेत. त्यातील पहिला आरोपी सुनील वाघेला हा धरावी मुंबई येथील रहिवाशी आहे. दुसरा आरोपी उमेश दुबे हा कांदिवली मुंबईचा रहिवाशी आहे तर तिसरा आरोपी साहिल चौहान हा तुर्भेगाव नवी मुंबई येथील रहिवाशी आहे. या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन ठिकाणी छापा टाकण्यात आला.

या छापेमारी दरम्यान पहिल्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला १ हजार मिलीलीटरच्या ५ बनावट स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्या, १ हजार मिलीलीटरच्या विविध ब्रँडच्या ५० रिकाम्या बाटल्या व दोन मोबाईल आधाळून आले. दुसऱ्या ठिकाणावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाला विदेशी बनावट १ हजार मिलीलीटरच्या ४८, २ हजार मिलीलीटरच्या २, ७०० मिलीलीटरच्या ३ अशा विविध ब्रँडच्या आणि मिलीलीटरच्या बनवत स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. तसेच १ हजार मिलीलीटरच्या ८५७ रिकाम्या बाटल्या, ८०० विविध ब्रांडचे लेबल, २ ड्रायर, २ टोचे असा मुद्देमाल आढळून आला तर तिसऱ्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी एक एमएच ४३ एयु २२६३ पांढऱ्या रंगाची दुचाकी, विदेशी मद्याच्या १ हजार मिलीलीटरच्या ४ बाटल्या एक मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या तीनही ठिकाणावर केलेल्या छापेमारी दम्यान त्यांनी एक काळ्या पिवळ्या रंगाची एमएच ०२ बीक्यू ८०८३ टॅक्सी व्हॅन, एमएच ४३ एयु २२६३ पांढऱ्या रंगाची एक दुचाकी, ७०० मिलीलीटर, १ हजार मिलीलीटर, २ हजार मिलीलीटरच्या ६२  बनावटी स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्या तसेच १ हजार मिलीलीटरच्या विविध विदेशी ब्रँडच्या हजारो रिकाम्या बाटल्या, ८०० विविध ब्रांडचे लेबर, ३ मोबाईल, २ ड्रायर, २ टोचे असा एकूण १४ लाख ३५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा तपास हा राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग अधीक्षक निलेश सांगडे यांच्या असून पुढील तपास सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क ‘ई-१’ ठाणे विभागाचे दुय्यम निरीक्षक संजय राठोड करत आहेत.