शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रविवारच्या मेगा ब्लॉकमध्ये ठाणे कल्याण मार्गावर झाली देखभाल दुरुस्तीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 17:11 IST

ठाणे-कल्याण विभागात जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वाशी-पनवेल विभागात ओएचईची वार्षिक तपासणी केली गेली.

डोंबिवली:  ठाणे ते कल्याण मुख्य मार्गावर रविवारी अप व डाऊन जलद मार्गावरील आणि वाशी ते पनवेल अप व डाउन  हार्बर मार्गावरील  मेगा ब्लॉक दरम्यान देखभाल कार्य केली.  त्यात  ठाणे ते कल्याण दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर २६० मीटर पॅनेल व १४ पॅनेल, ११ डीएसएस स्लीपर, १९ क्रॉसिंग स्लीपर व १३ मीटर रूळांचे नूतनीकरण करण्यात आले.  ६५ स्लीपर्सच्या शॅलो  स्क्रीनींगचे काम, एक पूर्ण सेट कालबाह्य एसईजेची जागा बदलणे आणि ग्लूड जोडांचे बदल देखील करण्यात आली.  विभागातील काही ठिकाणी ४५ स्क्रॅप रूळांचे गॅस कटींग व वेल्डिंगचे कामही करण्यात आले.  पारसिक बोगदा विभागात ६६ रूळांचे लोडिंग करण्यात आले.  विभागात ड्रेन साफसफाईचे कामही करण्यात आले.

तसेच ठाणे-कल्याण विभागात जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वाशी-पनवेल विभागात ओएचईची वार्षिक तपासणी केली गेली.  ४ इन्सुलेटर, २१ जीर्ण/निष्कामी ड्रॉपर्स बदलण्यात आले, २ इंसुलेटर्सची प्लंब  शिफ्टिंग आणि कटिंग करण्यात आली.  डिस्कनेक्शन / रिकनेक्शन आणि ४० बाँडिंगच्या तरतुदी व्यतिरिक्त संपर्क तारांचे धारण करण्याचे काम, मास्ट चे काढून टाकणे, सी-जंपर्सची तपासणी आणि बोगद्याखाली ओएचई च्या मंजुरीची तपासणी देखील करण्यात आली.  आवश्यकतेनुसार वृक्षतोडणी व छाटण्याचे कामही हाती घेण्यात आले.  ही कामे क्रेन स्पेशल, ४ टॉवर वॅगन्स आणि ५ शिडी गॅगसह केली गेली.

 सिग्नल व दूरसंचार कामे  एक पूर्ण सिग्नल युनिट,  फ्रीक्शन क्लचेस, तांबे ट्रॅकच्या शिशाच्या तारा, नट-बोल्ट, ब्रॅकेट्स बदलण्यात आले आणि संपूर्ण ग्राउंड कनेक्शन सेट्स करण्यात आले.  लीड वायर्स व डीएसी सेन्सरचे डिसकनेक्शन व पुन्हा जोडण्याचे काम तसेच ग्राउंड कनेक्शनचे कामही केले गेले.  याव्यतिरिक्त, दिवा आणि कोपर दरम्यान १.२५ कि.मी. रूळांच्या नूतनीकरणासाठी  इंजिनियरिंगशी समन्वय साधण्यात आला, ट्रॅक कनेक्शनची अखंडता तपासणे आणि डाऊन जलद मार्गाचे ट्रॅक पॅरामीटर्स मोजणे देखील सिग्नल व दूरसंचार वॉरियर्सनी केल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए  के सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :localलोकल