शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘महिलाराज’ करणार फैसला

By admin | Updated: June 1, 2016 02:30 IST

ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्यातील अत्यंत

सुरेश लोखंडे, ठाणेठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्यातील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ‘महिलाराज’चा फैसला हा अधिक प्रभावी असणार आहे. कारण या निवडणुकीत ५३९ नगरसेविका तर ५२१ नगरसेवक मतदान करणार आहेत.येत्या ३ जून रोजी १३ मतदान केंद्रांवर मतदान होत असून एकूण १०६० मतदार मतदान करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने पुरुषांच्या तुलनेत अधिक असलेल्या ५३९ महिला मतदार डावखरे, फाटक यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत.निवडणुकीच्या मतदानकेंद्रात उपविभागीत अधिकाऱ्यांच्या दालनांसह पालघर, शहापूर , वसई, कल्याण, मुरबाड, ठाणे आणि अंबरनाथ येथील तहसीलदारांची दालने मतदान केंद्रासाठी निश्चित केली आहेत. तर भार्इंदर येथील सर्कल कार्यालय आणि बेलापूर येथील विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयाची निवड केली आहे. अशा १३ मतदार केंद्रांमध्ये होणाऱ्या मतदानाची मतमोजणी येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये ६ जून रोजी पार पडणार आहे. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील मतदानामध्ये डहाणू नगरपरिषदेतील २५, जव्हार नगरपरिषदेतील १९ नगरसेवक मतदान करणार आहेत. जि. प. पालघरच्या ६५ सदस्यांसह पालघर नगरपरिषदेचे ३१, शहापूर नगरपंचायतीचे १९, वसई-विरार पालिकेचे १२० नगरसेवक मतदार करणार आहेत. याशिवाय भिवंडी-निजामपूर शहर पालिकेचे ९५, कल्याण-डोंबिवली पालिका १२७, मुरबाड नगरपंचायतीचे १९, उल्हासनगर पालिकेचे ७९, मीरा भार्इंदर पालिकेचे ९८, ठाणे पालिकेचे १३३, नवी मुंबई पालिकेचे ११६, अंबरनाथ नगरपरिषदेचे ६२ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे ५२ नगरसेवक मतदान करणार आहेत.