शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची बिले सापडली कचऱ्यात

By admin | Updated: June 6, 2016 01:23 IST

विरार शहरातील महावितरणची विजेची बिले नालासोपाऱ्यातील एका कचरा कुंडीत सापडली आहेत. यामध्ये वसई विरार महापालिका मुख्यालय, विरार पोलीस ठाणे आणि ठाणे जिल्हा

शशी करपे,  वसईविरार शहरातील महावितरणची विजेची बिले नालासोपाऱ्यातील एका कचरा कुंडीत सापडली आहेत. यामध्ये वसई विरार महापालिका मुख्यालय, विरार पोलीस ठाणे आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक अशा महत्वाच्या ग्राहकांच्या बिलांचाही समावेश असल्यामुळे बिलांचे वाटप करणाऱ्या ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्थ येथील पंपावरून पेट्रोल भरून निघालेला एक रिक्षाचालक लघुशंकेसाठी गेला असता तिथे त्याला एका कचरा कुंडीत कागदाचा गठ्ठा सापडला.त्याने तो उघडून पाहिला असता, त्यात विजेची बिले आढळून आली.त्यामुळे त्याने ही बिले फेरीवाला संघाचे कार्यकर्ते एस.आर.खान यांच्याकडे आणून दिली. खान यांनी तपासणी केली असता, ही बिले १८ मे २०१६ असल्याची तसेच ती भरण्याची अंतिम मुदत १ जून असल्याचे स्पष्ट झाले.ग्राहक क्रमांक 00१५ या सिरीजची ही एकूण १०२ बिले असून,त्यात वसई-विरार शहर महानगरपालिकेचे मुख्यालय, सुप्रिटेंडेंट आॅफ पोलीस म्हणजेच विरार पोलीस ठाणे आणि ठाणे जिल्हा को.आॅ.बँक अशा महत्वाच ग्राहकांचा समावेश आहे. ही बिले जोडून खान यांनी वीज वितरण कंपनीचे विरार येथील कार्यकारी अभियंता बा.भा. हळनोर यांना एक निवेदन दिले आहे. महत्वाची देयके अशाप्रकारे कचरा कुंडीत टाकणाऱ्या संबंधित ठेकेदार अथवा व्यक्तीची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी खान यांनी या निवेदनात केली आहे. ग्राहकाना वीजेची बिले वाटण्याचे कंत्राट महावितरण खाजगी व्यक्ती किंंवा संस्थेला देते. त्यासाठी प्रत्येक बिलामागे ५० पैसे बटवडा चार्ज दिला जातो. प्रत्येक ग्राहकाच्या हाती त्याची देयके मुदतीत मिळण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा बोजवारा बिल वाटप करणाऱ्या ठेकेदाराकडून अथवा त्याने नेमलेल्या व्यक्तीकडून उडवला जात आहे.