शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मयत तिवारीच्या कुटुंबीयांना महावितरणने नोकरी द्यावी, भाजपा नगरसेवक महेश पाटील यांचे उर्जामंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:00 IST

विजेची वायर अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या जितेंद्र तिवारीच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे अवघ्या ५० हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले असून ही तर त्या दु:खी कुटुंबीयांची थट्टा आहे.

डोंबिवली, दि. 12 - विजेची वायर अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या जितेंद्र तिवारीच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे अवघ्या ५० हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले असून ही तर त्या दु:खी कुटुंबीयांची थट्टा आहे. त्यांच्या कुटुंबीयांपैकी मयत जितेंद्रच्या पत्नीला अथवा मुलांना महावितरणमध्येच नोकरीची हमी द्यावी, असे पत्र भाजपाचे डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष आणि केडीएमसीचे नगरसेवक महेश पाटील यांनी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.यासंदर्भात महेश पाटील यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, महावितरण ज्या पद्धतीने एखाद्याने बील भरले नाही की दंड लावते, तशीच जाण या ठिकाणीही ठेवावी. मयताच्या कुटुंबीयांना अवघे ५० हजार ही मदत आहे की तोंडाला पाने पुसली. तसेच ज्या अर्थी महावितरणने अर्थसहाय्य केले, त्या दृष्टीने महावितरणने त्यांची चूक मान्य केली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने अर्थसहाय्य केले. तेवढीच तत्परता दाखवत महावितरणने त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी. ती कुठे द्यावी, कोणत्या विभागात, पदावर द्यावी याचा निर्णय शैक्षणिक योग्यतेनूसार घेण्यात यावा, अथवा नियमाने घ्यावा. पण नोकरीची हमी हवीच. महेश पाटील यांनीही तातडीने तिवारीच्या उपचारार्थ १० हजारांचे अर्थसहाय्य केले असल्याचे सांगण्यात आले. मयत तिवारीच्या कुटुंबीयांची परिस्थितीचा आढावा घेतला असता घरातला कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीयाला भविष्याची चिंता आहे, नोकरी देऊन महावितरणने निदान ती चिंता कमी करावी, आणि त्यांना दिलासा द्यावा असे महेश पाटील म्हणाले.