शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलाच्या तक्रारींकडे महावितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:57 IST

एकाला सरासरीपेक्षा अधिक तर दुसऱ्याला कमी बिल; मनसेचा आंदोलनाचा इशारा

ठाणे : यशोधननगर येथील रहिवाशांना दोन वेगवेगळ्या वीजमीटरवरील ग्राहक क्रमांक एकच देऊन एकाला सरासरीपेक्षा अधिक, तर दुसºयाला कमी बिल देणाºया महावितरणच्या भोंगळ कारभाराने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या शनिवारपर्यंत सोडवण्यात येईल, असे आश्वासन महावितरणने दिले होते. परंतु, अद्याप ती सोडविली नसल्याने महावितरणला मनसे स्टाइलने धडा शिकवण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.पंचशील अपार्टमेंट, यशोधननगर येथील वीजग्राहक संजय पाटील व दीपाली परब या दोन वेगवेगळ्या वीजग्राहकांच्या विद्युतमीटरवर ग्राहक क्रमांक एकच असून, पाटील यांच्या वीजदेयकावर वीजवाचन (रीडिंग) उपलब्ध नाही, असे येत आहे, तर परब यांना एका महिन्यात ७०० ते ८०० युनिटचे रीडिंग यायला लागले आहे. पाटील यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहणाºया गणेश सुतार यांना शेवटचे बिल ३३० रुपये, तर परब यांना ३२ हजार रुपये आल्याने दोन्ही ग्राहकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या.वीजबिल कमी येत असल्याने सुतार हे गेल्या १० महिन्यांपासून महावितरणकडे खेपा घालत आहेत. त्यांना महावितरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उद्धट वागणूक देत असल्याने त्यांनी मनसेकडे धाव घेतली. मनसे शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी ही बाब महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर ग्राहकांची समस्या तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले. अद्याप ही समस्या दूर न झाल्याने महावितरणच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.या दोन्ही ग्राहकांचे मीटर बदलले आहेत. परंतु, वाढीव बिल हे ग्राहकांना भरावेच लागेल. यात महावितरणची चूक नाही.- नारायण सोनावळे, कार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरण