शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या विरोधात महाविकास आघाडीची बॅनरबाजी

By अजित मांडके | Updated: January 11, 2024 14:30 IST

शिवसेना कुणाची या निकालानंतर ठाणे शहरात महाविकास आघाडीने आता बॅनर लावले आहेत.

ठाणे : शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केल्यानंतर गुरुवारी ठाण्यात महाविकास आघाडीचे एक बॅनर झळकले आहे. त्या बॅनरवर जळजळीत प्रतिक्रियेसह अब न्याय जनता करेगी... असे नमूद केले आहे. या बॅनरबाजीने ठाण्यातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर निकाल दिला. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे जल्लोष दुसरीकडे निषेध असे चित्र पाहण्यास मिळाले. दरम्यान दोन गटाच्या मित्रपक्षांनी आपापली भूमिका मांडली. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री विमानतळावर आल्यावर त्यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले.      ठाणे आणि बॅनरबाजी ही गोष्ट काही नवीन नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छा... ही महाविकास आघाडीने ठाणेकरांना देताना, मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानच्या जवळील नाक्यावर बॅनर लावत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तद्पूर्वी ही शिवसेना शिंदे गट आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात बॅनर बाजी पाहण्यास मिळाली होती. त्यातच शिवसेना कुणाची या निकालानंतर ठाणे शहरात महाविकास आघाडीने आता बॅनर लावले आहेत. त्याच्यावर प्रतिक्रिया देत अब न्याय जनता करेगी म्हणटले आहे.  तसेच त्या बॅनरवर फक्त महाविकास आघाडीच म्हटले आहे. अन्य कोणाचे नाव किंवा फोटो सुद्धा दिसत नसून बॅनरचा बॅकग्राऊंड पांढरा असून त्याच्या काळ्या रंगात प्रतिक्रिया नोंदविण्यात आलेली आहे. तसेच बॉर्डर लाल रंगाची दिसत आहे.  त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट किंवा महायुती त्या बॅनरला काय उत्तर देते याकडे राजकीय मंडळींसह ठाणेकर नागरिकांचे लक्ष लागले आहे. बहुदा आता ठाण्यात फक्त बॅनरच बोलणार की काय असे दिसत आहे.

असा आहे बॅनरवरील मजकूर

"आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली, अन लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली ! अब न्याय जनता करेगी...महाविकास आघाडी."

टॅग्स :thaneठाणे