शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

धर्म-जातीच्या आगी भडकवून पोळ्या भाजणे व खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी, नितीन बानुगडे पाटील यांची टीका

By धीरज परब | Updated: May 10, 2024 12:13 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: सत्ता आणि मत्ते साठी धर्म - जातीच्या आगी भडकवून भाजपा स्वतःची पोलीस भाजत आहे . गेल्या १० वर्षात काय केले ? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सांगत नाही . खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते प्रा .  नितीन बानुगडे पाटील यांनी भाईंदर येथील सभेत केले.

मीरारोड - सत्ता आणि मत्ते साठी धर्म - जातीच्या आगी भडकवून भाजपा स्वतःची पोलीस भाजत आहे . गेल्या १० वर्षात काय केले ? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सांगत नाही . खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते प्रा .  नितीन बानुगडे पाटील यांनी भाईंदर येथील सभेत केले.

उद्धव सेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री भाईंदरच्या नवघर शाळा मैदानात जाहीरसभा झाली . यावेळी बानुगडे पाटील म्हणाले कि , चीन ने भारताचा भाग बळकावला . राज्यात  १० महिन्यात २ हजार ३६६ शेतकरी आत्महत्या झाल्या . मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढली . ४५० चा गॅस सिलेंडर ११००वर तर पेट्रोल ११० वर गेले .  महागाई मुळे जनतेला जगणे मुश्किल झाले पण ह्यावर मोदी आणि भाजप बोलत नाही . भ्रष्टाचारी , बलात्कारी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत.

काळा पैसे देशात आणणार , प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार , २ कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार , महागाई रोखणार, प्रत्येकाला घर देणार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार, शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात तर बाबासाहेबांचे इंदू मिल मध्ये स्मारक उभारणार अश्या आता पर्यंतच्या दिलेल्या अनेक गॅरंटीचे काय झाले ? असा सवाल करत खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका बानुगडे पाटील यांनी केली.

खासदार विनायक राऊत म्हणाले कि , उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे नकली पुत्र म्हणून मोदींनी निर्भत्सना केली , शिवसेना तोडली याला महाराष्टाची जनता माफ करणार नाही .  काश्मिरी पंडित आजही बेघर आहेत पण स्वतःच्या मित्र उद्योगपतीला १ हजार एकर जमिन घेता यावी म्हणून कलम ३७० हटवले . जाती धर्मात भांडणे लावून एकमेकांची डोकी फोडायला लावण्याचे काम भाजपा करतेय असा आरोप राऊत यांनी केला.

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले कि , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा हव्या आहेत . महिला व शेतकऱ्यांवर अत्याचार , जनतेला महागाईचा मार तर बेरोजगार ना आणखी बेरोजगार मोदी आणि भाजपने केले आहे.

काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी भाजपा आणि मोदींवर टीका केली कि , ज्यांनी इंग्रजांना साथ दिली तेच आज राज्यातील गद्दारांचे सरदार आहेत . महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी वाढवून देशातील जनतेला मूर्ख बनवले आहे .  मोदी सांगतात कि आम्ही जगातील ५ वी अर्थसत्ता सांगतात आणि दुसरीकडे ८० कोटी जनतेला दारिद्र्य रेषेखाली म्हणून मोफत धान्य देतो सांगतात . यावेळी उद्धवसेना , राष्ट्रवादी पवार गट , काँग्रेस , आम आदमी पार्टी आदी पक्षांचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते . 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४thane-pcठाणेmira roadमीरा रोडNitin Banugade-Patilनितीन बानुगडे-पाटीलrajan vichareराजन विचारे