शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

By पंकज पाटील | Updated: October 27, 2024 06:34 IST

Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता काँग्रेस व उद्धवसेनेत विदर्भाच्या भूमीत रस्सीखेच सुरू असताना महायुतीमध्ये तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाल्याचे समोर येत आहे.

बदलापूर : महायुतीमध्ये निवडणूक निकालानंतर ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील मैदानावर शिंदेसेना व भाजपमध्ये शह-काटशहाचा खेळ सुरू झालाय. त्यात ठाणे शहर, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर अशा वेगवेगळ्या मतदारसंघात भाजप व शिंदेसेनेतील इच्छुक नेते परस्परांच्या विरोधात उमेदवारी दाखल करून दबावतंत्र वापरण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता काँग्रेस व उद्धवसेनेत विदर्भाच्या भूमीत रस्सीखेच सुरू असताना महायुतीमध्ये तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाल्याचे समोर येत आहे.

मुरबाडची बंडखोरी शहापूरमध्ये भोवणार?मुरबाड मतदारसंघात कथोरे यांच्या विरोधात म्हात्रे यांनी बंडखोरी केल्यास भाजप शहापूर आणि अंबरनाथ मतदारसंघात शिंदे सेनेसोबत ‘असहकार’ करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे मुरबाडमधील बंडखोरी ही शहापूर, अंबरनाथमध्ये शिंदेसेनेकरिता अडचणीची ठरू शकेल.ठाणे जिल्ह्यात एकूण १८ जागा असून येथे शिंदेसेनेचा वरचष्मा आहे. याच जागांच्या भरवशावर शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदेसेनेला ‘चेक-मेट’ केले तरच भाजपला आपला मुख्यमंत्री बसवता येईल. लोकसभा निवडणुकीत तसा प्रयत्न भाजपने केला असला तरी भिवंडीची जागा भाजपने गमावली. तर ठाणे, कल्याणची जागा शिंदेसेनेनी जिंकली आहे.

वामन म्हात्रे बंडाच्या पवित्र्यातमुरबाड मतदारसंघात किसन कथोरे यांच्या विरोधात शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे बंडाच्या पवित्र्यात आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिंदेसेनेचे महेश गायकवाड आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात भाजपचे नरेंद्र पवार बंडखोरीच्या वाटेवर आहेत. ठाणे जिल्ह्यात एका मतदारसंघात बंडखोरी झाली तर अन्य मतदारसंघात हिशेब चुकता करायला मित्रपक्ष तयार असल्याचे आता बोलले जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा