शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महाडचा विशाल चौगुले ठरला ‘आमदार श्री २०१७’चा मानकरी

By admin | Updated: April 28, 2017 00:17 IST

शिवसेना-युवासेना पुरस्कृत ओम साई मित्रमंडळ आदर्श नगर बिरवाडी महाड यांनी रायगड जिल्हा संघटनेच्या मान्यतेने आयोजित

बिरवाडी : शिवसेना-युवासेना पुरस्कृत ओम साई मित्रमंडळ आदर्श नगर बिरवाडी महाड यांनी रायगड जिल्हा संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘आमदार श्री २०१७’ चा किताब शिवसमर्थ जिम महाडच्या विशाल चौगुले यांनी पटकावला आहे, तर अलिबागचा जयेंद्र मयेकर बेस्ट पोझर ठरला आहे.महाडचे आ. भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये आमदार श्री २०१७ चा किताब पटकविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, महाड ,माणगाव, पेण, इंदापूर, पनवेल, खालापूर येथील सुमारे २३ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेतील ५५, ६०, ६५, ७०, ७५ किलो वजनी गटामध्ये प्रथम आलेल्या स्पर्धकांमधून आमदार श्री २०१७ ची निवड करण्यात आली. हा किताब महाडच्या विशाल चौगुले यांनी पटकाविला तर अलिबागचा जयेंद्र मयेकर हा बेस्ट पोझर व उपविजेता ठरला तसेच तृतीय क्र मांक माणगावच्या विनायक लोखंडे यांनी मिळवला आहे.या स्पर्धेकरिता पंच म्हणून सुनील नाहे, राजेश अनगत, विजय खरोसे, किशोर नारकर, रमेश खरे या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पंचांनी काम पाहिले. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी केले तर पारितोषिक वितरण रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, राजिप सदस्य मनोज काळीजकर, संजय कचरे, बिरवाडी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप कदम आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मनीष सावंत, उपाध्यक्ष भरत शिंदे, राहुल शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)