शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

ठाण्यात 1 लाख वृक्ष लागवडीचे महाअभियान

By admin | Updated: July 5, 2017 19:10 IST

आपला ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचं स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गडपरिसरातील मांगरुळ गावात

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 05 -   आपला ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचं स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गडपरिसरातील मांगरुळ गावात १ लाखझाडे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडलेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही झाडे जगवून येत्या पाच वर्षांत या परिसराचे रुपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाही देखील खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या विधायक उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मांगरूळ येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या पर्यावरणाच्या वारकऱ्यांमुळे यासंपूर्ण परिसराला वारकरी दिंडीचे स्वरूप लाभले होते. विधायक कार्याच्या पाठीशी जनशक्ती उभी राहिली की काय चमत्कार घडू शकतो, याची प्रचीतीच बुधवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,दिव्यज्योती ट्रस्ट, सीए असोसिएशन, एनएनएसचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी स्वयंसेविका आदी १५ हजारहून अधिक जणांचा सहभाग असूनही कुठलाही गोंधळ न होता, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अवघ्या दोन तासांमध्ये एक लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले.

सकाळपासूनच प्रत्येक स्वयंसेवक हातात रोपटे घेऊन मांगरुळचा डोंगर चढताना दिसत होता. छोटा-मोठा प्रत्येकजण हातात रोपटे घेऊन नेमून दिलेल्या जागी वृक्षारोपणास सज्ज होता. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ऊन पावसाच्या सुरू असलेल्या खेळाचा धागा पकडून निसर्गाचीही या उपक्रमाला साथ असल्याची मार्मिक टिप्पणी श्री. ठाकरे यांनी केली. लोकांची शक्ती एकवटली कि किती मोठे विधायक कार्य उभे राहू शकते, हे या उपक्रमाच्या माध्यमातून दिसून आले आहे, अशा शब्दांत पालकमंत्री श्री शिंदे यांनी कौतुकाची पावती दिली. भारतात आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रतिव्यक्ती झाडांचे प्रमाण भारतापेक्षा चीनमध्ये जास्त आहे. निदान याबाबतीत तरी चीनच्या पुढे जाण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही श्री शिंदे यांनी केले.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना या महाअभियानात सहभागी झालेल्या सर्व संस्था, संघटना आणि शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि प्रतिनिधींचे आभार मानले. हा उपक्रम जाहीर केला त्यावेळी मनात धाकधूक होती, परंतु सर्वांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हुरूप आला. चांगल्या कार्याच्या पाठीशी लोक नक्कीच उभे राहतात, हा विश्वास या कार्यक्रमाने दिला, असे ते म्हणाले. केवळ आजच्या दिवशी झाडे लावून हा उपक्रम संपणार नाही. या झाडांची निगा राखली जाईल आणि येत्या पाच वर्षांत इथे मानव निर्मित गर्द वनराई फुललेली असेल, असा विश्वास व्यक्त करून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हे विकसित करण्याची ग्वाही देखील श्री शिंदे यांनी दिली.पर्यावरणाचे संवर्धन हे केवळ शासनाचे काम नसून प्रत्येक व्यक्तीने त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, या हेतूने खा. डॉ. शिंदे यांनी लोकसहभागातून मांगरूळ येथे १ लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उपमुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे ८५ एकर जागा उपलब्ध करून दिली. खासदार डॉ. शिंदे यांनी विविध संस्था-संघटना, शाळा,महाविद्यालये यांना आवाहन केले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह सातत्याने बैठका घेतल्या. परिणामी, १५ हजारहून अधिक जणांनी या अभियानात सहभाग घेतला. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. महाराष्ट्र नेचर पार्कचे उपसंचालक अविनाश कुबल यांचे विशेष सहकार्य या अभियानाला लाभले.

गेल्या महिन्याभरापासूनच या ठिकाणी या महाअभियानाची नियोजनबद्ध तयारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यानेतृत्वाखाली सुरू होती. या महाअभियानाचे उत्कृष्ट नियोजन हा सर्व उपस्थित मान्यवरांच्या कौतुकाचा विषय होता. कार्यक्रम पार पडल्यानंतर पडलेले प्लास्टिकचे रॅपर, पाण्याच्या रिकाम्याबाटल्या आणि अन्य कचरा एनएसएस,एनसीसीचे विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांनीसाफ करून परिसर स्वच्छ केला. याप्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे,उपमुख्य वन संरक्षक जीतेंद्र रामगावकर, मांगरुळच्या सरपंच नंदिता पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदींची विशेष उपस्थिती या महाअभियानाला लाभली.⁠⁠⁠⁠