शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

७५०० मीटर कापडाचे भव्य प्रेममंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:32 IST

७५०० मीटर कापडाचा वापर करून धामणकरनाका मित्र मंडळाने मथुरा वृंदावन येथील १२५ फूट उंचीच्या प्रेममंदिराचा हुबेहूब पर्यावरणपूरक देखावा उभारला आहे.

भिवंडी : कापडनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीत उत्पादित केलेल्या ७५०० मीटर कापडाचा वापर करून धामणकरनाका मित्र मंडळाने मथुरा वृंदावन येथील १२५ फूट उंचीच्या प्रेममंदिराचा हुबेहूब पर्यावरणपूरक देखावा उभारला आहे. पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सवाचा देखावा यावर्षीदेखील गणेशभक्तांना आकर्षित करत आहे.शहरातील धामणकरनाका मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा तिसावे वर्ष आहे. यावर्षीदेखील शहरात उत्पादित झालेल्या कापडाचा उपयोग करून पर्यावरणपूरक भव्यदिव्य देखावा या मंडळाने उभारला आहे. धामणकरनाका येथे मथुरा वृंदावन येथील प्रेममंदिर उभारण्यासाठी ओरिसा येथील सुमारे २५० कामगारांनी अहोरात्र मेहनत घेतली. या मंदिरासाठी १० हजार लाकडी बांबू, वासे आणि सुमारे ७५०० मीटर कपडा वापरण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. या मंडळात सर्व जातीधर्मांचे तरुण सहभागी होऊन हा उत्सव शांततेत साजरा करत असतात. त्यानुसार, स्वाभिमान श्री गणेश दर्शन स्पर्धा, शहरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृती चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांकरिता पथनाट्य स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, गरजू महिलांना शिवणयंत्रेवाटप, शहरातील शिस्तबद्ध गोविंदा पथकांचा बहुमान असे विविध उपक्रम मंडळाकडून राबवले जातात. गणेश दर्शनाचा प्रथम मान पडघा मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना दिला जातो. त्यांच्या हस्ते पूजन करून नंतर भक्तांना दर्शनाकरिता मंडपात प्रवेश दिला जातो.>धामणकरनाका येथे गणेशभक्तांची अलोट गर्दी होत असते. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता संपूर्ण धामणकरनाका परिसरात २० सीसी कॅमेरे लावून त्यांचे नियंत्रण पोलीस विभागास देण्यात येते. याव्यतिरिक्त भक्तांच्या मदतीकरिता ३० सुरक्षारक्षक, मंडळाचे स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. हे वाहतुकीसह इतर परिस्थितीकडेही लक्ष ठेवतात.

टॅग्स :bhiwandiभिवंडी