शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा मासिका महोत्सव 4 खंडांमधील 19 देशांमध्ये होणार साजरा 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 17, 2023 14:17 IST

पाकिस्तान, पॅराग्वे, पेरू, सिएरा लिओन, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, चिली, कोलंबिया, इक्वेडोर आणि कॅमेरून येथे प्रथमच पीरियड फेस्टिव्हल होणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणें : क्रीडा, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मासिक पाळीच्या प्रतिबंधांना दूर करण्याचा उद्देश असलेला मासिका महोत्सव 4 खंडांमधील 19 देशांमध्ये 35 संस्थांद्वारे साजरा केला जाणार आहे. भारतातील, महाराष्ट्र, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, बिहार, गुजरात, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान, नवी दिल्ली, झारखंड आणि केरळ या 11 राज्यांमध्ये हा महोत्सव होणार आहे. 21 मे ते 28 मे 2023 या कालावधीत मासिका महोत्सव साजरा केला जाणार आहे. 

पाकिस्तान, पॅराग्वे, पेरू, सिएरा लिओन, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, चिली, कोलंबिया, इक्वेडोर आणि कॅमेरून येथे प्रथमच पीरियड फेस्टिव्हल होणार आहे अशी माहिती म्युज फाऊंडेशनने दिली.  अनेक संस्कृतींमध्ये सामाजिकरित्या निर्माण झालेल्या मासिक पाळीच्या अनेक नकारात्मक अनुभवांना होकारार्थी आणि सर्जनशील प्रतिसाद म्हणून संकल्पित, मासिका महोत्सव सण आणि उत्सव या संकल्पनेतून एक आदर्श बदल घडवून आणून मासिक पाळी येणा-यांना सशक्त करण्याचा प्रयत्न करण्याचा या महोत्सव मागचा उद्देश आहे. 

मासिक पाळी येणाऱ्यांच्या गरजा ओळखण्यात राज्य आणि नागरी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष परिस्थितीला आणखी गंभीर बनवते व याचा त्यांच्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे मासिक पाळी हा त्यांच्यासाठी विविध ठिकाणी जाण्यापासून मर्यादित करणारा घटक बनला आहे. घरातील स्वयंपाकघर असो, शाळा असो, कामाच्या ठिकाणी असो किंवा सिनेमा आणि लोककथांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व असो, जागा हा वादग्रस्त क्षेत्र बनला आहे. म्हणूनच, 'रिक्लेमिंग स्पेसेस' ही मासिका महोत्सव २०२३ साठी थीम म्हणून निवडली गेली आहे. मासिक पाळी अनुभवणाऱ्यांवरील निषिद्ध आणि कलंक नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रतिगामी समजुतींचे विघटन करणे हा एक केंद्रबिंदू आहे. पुरुषांना सहयोगी म्हणून सामील करून घेण्याचाही या उत्सवाचा उद्देश आहे जेणेकरून ते मासिक पाळी अनुभवणाऱ्यांच्या हक्कांसाठी उभे राहून स्वतःच्या प्रणालीगत विशेषाधिकाराचा वापर करू शकतील.असे मुज फाऊंडेशनचे निशांत बंगेरा यांनी सांगितले. 

मासिक पाळीवर सकारात्मक चर्चा करण्यासोबतच, हा सण शाश्वत मासिक पाळीबद्दल जागरूकता वाढवतो. जसे मासिक पाळीला तोंड द्यायला कापडी पॅड वापरला जातो तसेच मासिक पाळीच्या कपसारख्या नवीन पर्यायांना अधिक ओळख आणि स्वीकृती देणे आवश्यक आहे. मासिका महोत्सव, अशा प्रकारे, एक संवाद सुरू करून अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये लोक मुक्तपणे व आनंदाने सहभागी होऊ शकतात. आमच्या भागीदार सामाजिक संस्था समाजातील मासिक पाळीच्या निषिद्धांच्या बेड्या तोडण्यात मोठी भूमिका बजावतात आणि जास्तीत जास्त प्रभाव निर्माण करण्यासाठी संगीत, नृत्य, क्रीडा, कला इत्यादीद्वारे उत्सवाला त्यांच्या स्वत: च्या मार्गाने अनुकूल करण्यासाठी कार्य करतात असेही म्यूजचे म्हणणे आहे.