शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा फेरीवाल्यांविरुद्ध राडा, दादर, कुर्ला, अंधेरीतून पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 07:11 IST

राज ठाकरे यांनी दिलेली १५ दिवसांची मुदत संपताच, त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आदी रेल्वे स्थानकांच्या बाहेरील फेरीवाल्यांकडे आपला मोर्चा वळवला.

ठाणे/कल्याण : राज ठाकरे यांनी दिलेली १५ दिवसांची मुदत संपताच, त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आदी रेल्वे स्थानकांच्या बाहेरील फेरीवाल्यांकडे आपला मोर्चा वळवला. मनसैनिकांनी फरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड करून, फेरीवाल्यांना मारहाणही केली. मनसैनिक माघारी वळताच फेरीवाल्यांनी लागलीच पुन्हा बस्तान बसवले. त्यामुळे मनसेचे आंदोलन हा निव्वळ फोटो स्टंट ठरला.राडा करणा-या मनसैनिकांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. काही ठिकाणी पोलिसांसमोरच हा प्रकार सुरू होता, असे फेरीवाल्यांनी सांगितले. रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटवा अन्यथा मनसेच्या स्टाइलने हटवू, असा इशारा दिला होता. तरीसुद्धा फेरीवाले हटत नसल्याचे पाहून १६ व्या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांवर हल्लाबोल करीत त्यांच्या वस्तूंची फेकाफेक केली, तोडफोड केली आणि फेरीवाल्यांना हुसकावून लावले.ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० मनसैनिकांनी स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. फेरीवाल्यांना त्यांनी मारहाण केली. जाधव यांच्यासह ६ ते ७ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, कोणालाही अटक केली नाही. कल्याणमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर रेल्वे सुरक्षा बलाने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. कल्याण स्थानक परिसरात आंदोलन केल्याबद्दल मनसेचे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनसेने ठाणे व कल्याण रेल्वे स्थानकात आंदोलन केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी डोंबिवली परिसरातील फेरीवाले हटवले. मनसे आंदोलनापूर्वीच दादर, कुर्ला आणि अंधेरी येथील पुलासह परिसरात फेरीवाले शनिवारी गायब झाले. -वृत्त/३मनसेचे फेरीवाल्यांविरुद्धचे आंदोलन निषेधार्ह असून, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू. आंदोलन करण्यास प्रोत्साहन देणाºयांच्या विरुद्धही न्यायालयात जाणार आहोत, असे ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेhawkersफेरीवाले