शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

गुंगीचे औषध देऊन लुटणारा अटकेत

By admin | Updated: June 1, 2017 05:38 IST

म्पो चालकाला ज्युसमध्ये गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : टेम्पो चालकाला ज्युसमध्ये गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारात चालकाच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. त्याच्याविषयी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपरी गावातून त्याला अटक केली.बिलाल सही खान (५०) असे पोलिसांनी अटक केलेल्या लुटारुचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. त्याने सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टेम्पो चालकासोबत ओळख करुन ज्युसमध्ये गुंगीचे औषध दिले होते. यामुळे टेम्पो चालक बेशुध्द झाल्यानंतर त्याने टेम्पो चालकाच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून पळ काढला होता. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याच्याविषयी गुन्हे शाखा कक्ष एकच्या पथकाला माहिती मिळाली होती. यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर, वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विक्रम बनसोडे, अविनाश माने, योगेश तांबोळी, उपनिरीक्षक भगवान तायडे, हवालदार दीपक पाटील, बाबाजी थोरात, विवेक कठाळे, राहुल केळगंद्रे यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी खान हा कोपरी गावालगतच्या परिसरात आला असता पथकाने त्याला अटक केली. त्याने अशा प्रकारे इतरही गुन्हे केल्याची शक्यता असल्याने अधिक चौकशीसाठी सानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.