शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंतांना डावलले; सेनेत बंडाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:12 IST

कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत, सुशिक्षित कार्यकत्यांना डावलून आयारामांच्या घरातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अनेक ठिकाणी बंडाचा झेंडा फडकावण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत, सुशिक्षित कार्यकत्यांना डावलून आयारामांच्या घरातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अनेक ठिकाणी बंडाचा झेंडा फडकावण्यात आला आहे. प्रभाग १२ व १३ मधील पदाधिकाºयांनी राजीनाम्याचा इशारा दिला असून काहींनी राजीनामा दिल्याची चर्चा असल्याने निवडणुकीपूर्वीच ‘जय महाराष्ट्र’ची ललकारी ऐकू येऊ लागली आहे.सर्वधर्मसमावेशक आणि सर्वाधिक मराठी उमेदवारांना संधी दिल्याचा दावा शिवसेनेतर्फे केला जात असला तरी अनेक वर्षे निष्ठेने काम करणाºयांना उमेदवारीपासून रोखणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा डावललेल्या कट्टर शिवसैनिकांत सुरु आहे. सुरुवातीला उमेदवारी देतो असे सांगून ऐनवेळी इतर पक्षातून शिवसेनेत आलेल्या पर्यायी दावेदाराला उमेदवारी दिल्याने अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. वरिष्ठ स्तरावरुन या शिवसैनिकांची समजूत काढली जात असली, तरी यातील बहुसंख्यांनी पक्षातील या आयारामांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय गेतला आहे.शिवसेनेत कालपरवा आलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा मोठे झालेत का? अशी तिखट प्रतिक्रिया उमटू लागली आहे. काही प्रभागांत तर आयारामांनी शिवसैनिकांनी विश्वासात न घेताच प्रचारालाही सुरुवात केल्याने सेनेत कुरबुरीने डोके वर काढले आहे. सेनेतील निष्ठावंतांना डावलून फक्त आर्थिक कुवतीच्या जोरावर प्रचार केला जात असेल; तर अशा उमेदवारांना आम्ही सहकार्य करणार नसल्याची भूमिका घेतल्याने धुसफूस सुरु आहे. आम्ही बाळासाहेबांच्या पक्षासाठी काम करतो. कोणा आयारामांसाठी नाही, असे उघडउघड इशारे सुरू झाले आहेत.शिवसेनेतही सुशिक्षित कार्यकर्ते आहे. त्यांचाही जनसंपर्क व लोकसेवा दांडगी असतानाही त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्याची खदखद बाहेर पडून लागली आहे.काही प्रभागात एखाद्या आयारामाला संधी देणे ठिक आहे. पण या आयारामांच्या एकाच घरात दोन, तीन, पाच सदस्यांना उमेदवारी देणे, हे निष्ठावंतांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची तीव्र भावना व्यक्त होऊ लागली आहे.त्यामुळे प्रभाग १२ व १३ मधील पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा सुरु आहे. प्रभाग १२ मधील शाखाप्रमुख प्रवीण कृष्णा उतेकर, उपविभागप्रमुख विशाल मोरे व रवींद्र शिवाजी चिल्ले, उपशाखाप्रमुख सुनील बेनके, गटप्रमुख कमलेश इंदुलकर व दीपक निकम, प्रभाग १३ मधील विभागप्रमुख प्रकाश मोरे, उत्तर भारतीय सेलचे विभागप्रमुख रामअवतार आदींचा समावेश आहे. प्रभाग १२ मधील विभागप्रमुख संदीप भोसले यांनी तर शिवसेना सोडून विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम परिषदेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेतील हे बंड झपाट्याने पसरू लागले आहे.मी शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा सैनिक आहे. कारगिल युद्धातील निवृत्त अधिकारीसुद्धा आहे. माझा जनसंपर्क दांडगा असतानाही एक सुशिक्षित उमेदवार म्हणूनही माझा विचार झाला नाही. याउलट इतर पक्षांतुन आलेल्यांना उमेदवारी दिल्याने मी शाखाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.- प्रवीण उतेकर, प्रभाग १२ मधील शाखाप्रमुखशिवसेनेत जे नाराज असतील त्यांची समजूत काढली जात आहे. अद्याप कोणीही पदाचा राजीनामा दिलेला नाही. नाराजांशी वरिष्ठ नेते व्यक्तिश: चर्चा करीत आहेत. ते त्यांची नाराजी दूर करतील. लवकरच शिवसेनेतील सर्वच निष्ठावंत पक्षाला बहुमत मिळवून देण्यासाठी एकत्रित काम करतील. - धनेश पाटील,शिवसेना शहरप्रमुख