शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयाची हत्या केल्याप्रकरणी प्रियकर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:08 IST

काटेमानिवली येथील घटना : शाप देणे बेतले जीवावर

कल्याण / मुंब्रा : कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहणाऱ्या धीरज उर्फ रेवा देसाई या तृतीयपंथीयाला शाप दिल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचा प्रियकर सुशील भालेराव याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास उघडकीस आली. ‘तुझे खानदान नष्ट होईल,’ असा शाप रेवाने सुशीलला दिला होता. यात त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. याचा राग सुशीलला होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

रेवा देसाई हा १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहत होता. तो काटेमानिवली येथील शिवसह्याद्री कॉलनीतील चाळीत वास्तव्याला होता. दरम्यान मागील तीन दिवसांपासून रेवाच्या घराच्या दरवाजाला लॉक होते. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडा दिसल्याने खोली मालकीणीची मुलगी भाग्यश्री हंजनकर हिने प्रथम रेवाला आवाज दिला. परंतु, कोणीही बाहेर न आल्याने तिने आत जाऊन पाहिले असता बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळयात रेवाचा मृतदेह चटईवर पडलेला आढळून आला. त्याच्या शरीरावर धारधार हत्याराने वार झाले होते. याची खबर तत्काळ स्थानिक कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान, सुशीलने हत्या केल्याचा आरोप रेवाच्या नातेवाइकांनी केला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. सुशीलच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती.मैत्रिणीशी झाले होते संभाषणसुशील नेहमी रेवाच्या घरी यायच्या. पण संशयावरून तो रेवाला सातत्याने मारहाण करायचा. १६ मे रोजीदेखील तो घरी आला होता आणि संशयावरून रेवाला त्याने मारहाण केली होती. ही माहिती रेवाच्या एका मैत्रिणीने त्याच्या नातेवाइकांना दिली. तिने रेवाला फोन केला होता, तेव्हा माझी तब्येत बरी नसून, सुशील हा माझेकडे आला आहे व तो संशय घेऊन मला मारहाण करीत आहे, असे त्याने मैत्रिणीला सांगितले होते.मुंब्रा पोलिसांची कारवाईहत्या करून पसार झालेल्या सुशीलला मुंब्रा पोलिसांनी शिताफीने मंगळवारी सकाळी मुंब्रा रेतीबंदर परिसरातून अटक केली. त्याचा ताबा कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आला.गुरुवारीच झाली हत्यारेवाच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास हत्येची घटना उघडकीस आली. परंतु, सुशीलने रेवाची हत्या मागील गुरुवारी पहाटेच्या सुमारास केली होती. यानंतर तो घराला कुलूप लावून तो निघून गेला होता. दरम्यान रेवाचा खरोखरच मृत्यु झाला आहे का हे पाहण्यासाठी रविवारी त्याने पुन्हा त्याचे घर गाठले आणि दरवाजाला कुलूप न लावताच तेथून निघून गेला.वडिलांची कैची खुपसून हत्याडोंबिवली : खर्चाला कमी पैसे देत असल्याच्या रागातून मुलाने वडिलांवर कैचीचे वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे पश्चिमेकडील कोपर रोड परिसरात घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी मुलगा अरविंद हरके यास अटक केली आहे. तर, सुभाषचंद्र (७०) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. वडील हे नातेवाइकांना खर्चाला पैसे देत होते. मात्र, आपल्याला कमी पैसे देतात, असा राग अरविंदच्या मनात होता. मंगळवारी पहाटे दोघांमध्ये या कारणावरून जोरदार भांडण झाले. संतापलेल्या अरविंदने कैचीने सुभाषचंद्र यांच्या मानेवर वार केला, तसेच डोक्यात हातोड्याने प्रहार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.