कल्याण : कोयत्याचा धाक दाखवून त्रिकुटाने आॅनलाइन लॉटरीचालकाला ४२ हजार रुपयांना लुटल्याची घटना रविवारी रात्री कल्याण पूर्व येथे घडली. कल्याण पूर्वेतील तेजपालनगरसमोर प्रबोधन मारु ती देवकर यांचे शौर्या आॅनलाइन लॉटरी नावाचे दुकान आहे. देवकर रात्री ९ च्या सुमारास विकास गिरी यांच्यासमवेत दुकानात बसले असताना तिघे जण तेथे आले. देवकर यांना त्यांनी प्लास्टिकच्या गोणीतील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या गल्ल्यातील ४२ हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. देवकर आणि गिरी यांनी त्यांना विरोध केला. मात्र, त्रिकुटाने त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत धक्काबुक्की करत पळ काढला.
लॉटरीचालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले
By admin | Updated: May 30, 2017 05:49 IST