शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

घर लागल्याचे सांगून दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:32 IST

प्रधानमंत्री योजनेत तुम्हाला घर लागले आहे, अशी बतावणी करून कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने घरातील ७२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने लुटल्याचा प्रकार शनिवारी घडला

ठाणे : प्रधानमंत्री योजनेत तुम्हाला घर लागले आहे, अशी बतावणी करून कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने घरातील ७२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने लुटल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.भास्करनगर भागातील एका ३० वर्षीय महिलेला एका भामट्याने फोन करून ‘तुम्हाला प्रधानमंत्री योजनेत घर मिळाले आहे’, अशी ५ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बतावणी केली. त्यासाठी कागदपत्रे लागणार असल्यामुळे तिच्या मुलालाच ठाण्याच्या कोर्टनाका येथे त्वरित आधारकार्ड तसेच इतर कागदपत्रांची झेरॉक्स प्रत घेऊन येण्यास सांगितले. ही महिला मुलासह कागदपत्रे घेऊन तिथे गेल्यानंतर तिच्या घरात शिरून या भामट्याने मंगळसूत्रासह ७२ हजार ५०० चे दागिने चोरून पलायन केले. विचित्र प्रकारे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने रात्री ८ वाजताच्या सुमारास कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, १८ जुलै रोजीही साईनाथनगर येथील राज भोसले यांच्या पत्नीला घरकुल योजनेत फॉर्म भरला आहे का, अशी विचारणा करणाºया भामट्याने राज यांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर, त्यांना फोन करून त्यांच्याकडूनही त्याने ३० ते ३५ हजारांचे दागिने लुबाडले.....................आमिषाला बळी पडू नकाकोणीही कोणत्याही योजनेत घर किंवा पैसे देण्याचे आमिष दाखवले, तर कोणतीही कागदपत्रे देऊ नका. अशा कोणत्याही योजनेची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच संबंधित विभागात कागदपत्रे द्या. पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांनी केले आहे.