शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट फिरणाऱ्या कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

कल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने केडीएमसीने अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि होम आयसोलेशन असलेले ...

कल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने केडीएमसीने अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि होम आयसोलेशन असलेले अनेक जण शहरात मोकाट फिरत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी ते राहत असलेल्या सोसायटीला पोलीस फोन करून ताकीद देणार आहेत. त्यानंतर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

कोरोनासंदर्भातील आयुक्तांची एक बैठक मंगळवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झाली. यावेळी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर आयुक्तांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी वाढला होता. त्यावेळी प्रत्येक वॉर्डात कोरोना नियंत्रण समिती नेमली होती. त्यात नगरसेवक होते. त्यात आता माजी नगरसेवकांचाही सहकार्य घेऊन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांची मदत घेतली जाईल. कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. बैठकीतील चर्चेनुसार पाटीदार भवन येथील कोविड सेंटर येथे आणि दोन आरोग्य केंद्रांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील जी खासगी रुग्णालये मोफत लसीकरण करण्यास तयार आहे, त्यांना लसीकरण केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्याचा विचार करण्यात येणार आहे. पाच दिवस पुरेल इतका लसीचा साठा मनपाकडे आहे. लसीचा नवीन साठा बुधवारी, ३१ मार्चला येणार आहे. लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

‘शिष्टमंडळाद्वारेही मागणी करता आली असती’

डोंबिवलीत व्यापाऱ्यांनी केडीएमसी निर्बंधांविरोधात शनिवारी रस्त्यावर ठिय्या दिला. दुकानदारांना एक दिवसाची शिथिलता हवी होती. त्यानुसार त्यांना ती दिली. व्यापाऱ्यांनी जबाबदारीने कोरोनाचे नियम पाळले पाहिजे होते. रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा शिष्टमंडळाद्वारे प्रशासनाकडे मागणी करता आली. नियम मोडले म्हणून १२५ व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई योग्य असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

‘आदेश सगळ्यांनाच लागू ’

मात्र, शिथिलता देऊनही काही दुकानदारांनी कोरोना नियमावलीचा भंग केला आहे. तसेच दारूची दुकाने उघडी होती. उत्पादन शुल्क विभागाकडून दारूच्या दुकानदारांना सूचित केले गेले नसल्याची बाब समोर येत असल्याने त्यांना यापुढे सूचित केले जाईल. मात्र, साथरोग नियंत्रणात एका विशिष्ट यंत्रणेसाठी नियम काढता येत नाही. आदेश हा सगळ्य़ांनाच लागू असतो, असे आयुक्तांनी सांगितले.

--------------------------