शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लाँग वीकएण्डला ठाणेकरांचे मँगो पर्यटन

By admin | Updated: April 12, 2016 01:04 IST

मुलांच्या वार्षिक परीक्षा संपतासंपता एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गुरूवारपासून आलेल्या लाँग वीकएण्डला सर्वाधिक ठाणेकरांची पसंती आहे, कोकणात जाऊन आंबे खायला.

- प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेमुलांच्या वार्षिक परीक्षा संपतासंपता एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गुरूवारपासून आलेल्या लाँग वीकएण्डला सर्वाधिक ठाणेकरांची पसंती आहे, कोकणात जाऊन आंबे खायला. त्याचबरोबर तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेण्यास आणि उन्हाची तलखी सोसवत नसल्याने थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आल्हाददायी अनुभव घेण्यासही पसंती दिल्याचे टूर आॅपरेटर्स, सहलीच्या आयोजकांनी सांगितले. १४ ते १९ एप्रिलदरम्यान ठाण्यातील बहुतांश कुटुंबे सुटीची मजा लुटणार आहेत. वाढलेला उकाडा पाहता ठाणेकरांनी स्वाभाविकपणे आपला मोर्चा वळवला आहे थंड हवेच्या ठिकाणी. त्यामुळे अनेक जण ही सहा दिवसांची सुटी कोकणातच घालवणार आहेत. कोकण पाठोपाठ तीर्थयात्रेला पसंती आहे. बहुतांश शाळांच्या परीक्षा बुधवारपर्यंत संपत आहेत. त्याला जोडूनच पालकांनाही पालकांनाही मोठी सुटी आहे. त्यामुळे या लाँग वीकएण्डचा फायदा घेत ठाणेकरांचे नियोजन आहे. बहुतांश ठाणेकरांनी कोकणात जाण्यावर अधिक भर दिल्याचे टुर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बुकींगवरून दिसून आले. धार्मिक सहली-तीर्थयात्रांमध्ये अष्टविनायक, शिर्डी-शनिशिंगणापूर, अक्कलकोट-गाणगापूर -पंढरपूर- तुळजापूर, तिरूपतीसह अन्य स्थळांचाही समावेश आहे. दुष्काळात कोकणाला पसंतीविदर्भाचा काही भाग, मराठवाड्याचा मोजका पट्टा येथील पाण्याच्या भीषण टंचाईमुळे यंदा कोकणात सुटी घालविण्याचा निर्णय ठाणेकरांनी घेतल्याचे निरीक्षणही वेगवेगळ््या सहलींचे आयोजक व टुर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मालकांनी नोंदविले.१४ ते १७ एप्रिलदरम्यान अष्टविनायकाच्या पॅकेजला आमच्याकडे सर्वाधिक पसंती आहे. यात कुटुंबांनी केलेल्या बुकिंगची संख्या अधिक आहे.- विकास शेलार, ए टू झेड ट्रॅव्हल्सया सहा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये ठाणेकर महाराष्ट्रातील जवळपासच्या ठिकाणी आणि सापुताऱ्यासह गुजरातच्या मोजक्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु सर्वाधिक संख्या कोकणात जाणाऱ्यांची आहे. त्यापाठोपाठ महाबळेश्वर, काश्मीर, सिमला-कुलू-मनाली, कुर्ज, केरळ या ठिकाणांना पसंती आहे. ही संख्या कोकणाच्या तुलनेत कमी आहे. कोकणाबरोबरच धार्मिक स्थळी जाण्याकडेही ठाणेकरांचा ओढा आहे.- श्रीकांत दांडेकर, अमेय ट्रॅव्हल्सया लाँग वीकएण्डमध्ये कोकणात जाण्यास ठाणेकरांनी प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ परदेशी सहलींत सिंगापूरलाही पसंती आहे.- राजेश्वर मुळे, इनक्रेडिबल हॉलीडेज