शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत जलमित्र’ अभियानास पंचतारांकित हॉटेल्सचा पाठिंबा

By admin | Updated: May 11, 2016 02:06 IST

‘लोकमत’ने सुरू केलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानाला आता देश पातळीवरून पाठिंबा मिळणे सुरु झाले आहे. पश्चिम भारतातील पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टचे नेतृत्त्व करणाऱ्या

मुंबई: ‘लोकमत’ने सुरू केलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानाला आता देश पातळीवरून पाठिंबा मिळणे सुरु झाले आहे. पश्चिम भारतातील पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टचे नेतृत्त्व करणाऱ्या हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनने (वेस्टर्न इंडिया) मंगळवारी ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीत जलमित्र अभियानास पाठिंबा देत सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या अभियानात संघटनेशी संलग्नित १ हजार ८०० पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टही जोडले जाणार आहेत.संघटनेचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी या अभियानाला पाठिंबा दिला. तर अभियानाच्या सविस्तर चर्चेसाठी झालेल्या बैठकीत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप दातवाणी आणि उपाध्यक्ष शेरी भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘लोकमत’च्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी पाणी बचतीसाठी आखलेल्या योजनेवर सविस्तर चर्चा केली. शिवाय जलमित्र अभियानाच्या माध्यमातून ‘लोकमत’ कशाप्रकारे पाणी बचत महत्त्व पटवून देणार हे स्पष्ट केले. अधिकाधिक वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यावर ‘लोकमत’चा या अभियानात भर राहणार असल्यावर विस्तृत चर्चा यावेळी झाली. बैठकीअंती मुंबईसह राज्यात हे अभियान राबवण्याचा निर्णय संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप दातवाणी यांनी व्यक्त केला. शिवाय राज्यासोबतच पश्चिम भारतात येणाऱ्या इतर राज्यांतील संघटनेच्या सभासद हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्सनाही या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले. तर संघटनेचे उपाध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, पंचतारांकित हॉटेल्सच्या माध्यमातून केवळ नफा कमाविणे हा उद्देश नाही. सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही संघटना करत आहे. संघटनेचा हा उद्देश या अभियानाच्या माध्यमातून जलजागृती केल्यानंतर लोकांच्या आपोआपच लक्षात येईल. (प्रतिनिधी)> संघटना पूर्ण क्षमतेने उतरणार‘लोकमत’ने सुरू केलेल्या या अभियानास संघटनेचा पाठिंबा आहे. संघटनेने पाणी बचतीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र या अभियानाच्या माध्यमातून आता आणखी एक पाऊल पुढे जाता येणार आहे. मुळात समाजाच्या तळागाळापर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचवण्यात अभियानाची मदत होणार आहे. त्यामुळे या जलजागृतीमध्ये संघटना संपूर्ण क्षमतेने उतरणार आहे.-भरत मलकानी, अध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय> प्रत्येक थेंबाचा वापर होणारसंघटनेने पाणी बचतीसाठी प्रत्येक ग्राहकाला अर्धाग्लास पाणी देण्याचे आवाहन सर्व हॉटेल आणि रेस्टॉरन्टला केले होते. मात्र त्यानंतरही काही प्रमाणात पाणी वाया जात होते. मात्र ‘लोकमत’च्या अभियानामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होणार आहे. तरी सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टने या अभियानात सामील होऊन सामाजिक भान जपायला हवे.- दिलीप दातवाणी, वरिष्ठ उपाध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय> लाखो लीटर पाणी वाचवूपंचतारांकित हॉटेल्समधील फ्लश आणि वॉश बेसिनमधील नळाचा प्रेशर कमी करून पाणी बचतीसाठी संघटनेने प्रयत्न सुरू केले. शिवाय अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे, गरज नसल्यास एकच टॉवेल पर्यटकांनी दोन दिवस वापरावा, असे आवाहन करणारे पोस्टर्स संघटनेने बहुतेक हॉटेलमध्ये आणि रूम्समध्ये लावलेले आहेत. त्यात आत्ता ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानामुळे आणखी जलजागृती करता येणार आहे. परिणामी आणखी लाखो लीटर पाणी वाचवण्यात संघटनेला यश येईल, अशी खात्री आहे. - शेरी भाटिया, उपाध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय