शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा दणका: बैलगाड्यांच्या शर्यती भरविणाऱ्यांवर गुन्हा, कायमस्वरूपी कारवाई गरजेची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 07:50 IST

अंबरनाथ तालुक्यातील ऊसाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाकाळात बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील ऊसाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाकाळात बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ऊसाटणे गावाच्या माळरानावर २३ मे रोजी सकाळी बैलगाड्यांची शर्यत आयोजित केली होती. बैल गाड्यांच्या शर्यतीवर बंदी असतानादेखील अशा प्रकारची शर्यत भरवल्याप्रकरणी आणि शर्यतीसाठी गर्दी जमवल्याप्रकरणी चार जणांविरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात प्रवीण पाटील, महेश पाटील, सचिन भंडारी आणि गुरुनाथ पाटील या आरोपींचा समावेश आहे.अंबरनाथच्या ग्रामीण भागात बेधडकपणे अनेक बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात येत असतात. या बैलगाडी शर्यतीकडे पोलीस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. अखेर या प्रकरणात लोकमतमध्ये वृत्त येताच पोलीस प्रशासनाने बैलगाडी शर्यत आयोजित करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेकदा नियम धाब्यावर बसवून बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. मात्र गाजावाजा झाला तरच पोलिसांकडून कारवाई केली जाते. उसाटणे गावातील व्हिडिओ सोमवारी सकाळपासून व्हायरल झाला असून त्यानंतरही पोलिसांकडे मात्र याबाबत कुठलीच माहिती नव्हती. शर्यतींवर बंदी असतानाही त्या आयोजित होतातच कशा आणि कुणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

५० हजार ते दोन लाखांपर्यंतची शर्यत  अंबरनाथ ग्रामीण भागांमध्ये लॉकडाऊन असतानादेखील अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. पोलिसांच्या भीतीपोटी अनेक शर्यती या सकाळी सात ते सकाळी दहाच्या दरम्यान घेण्यात येत आहेत. ५० हजार ते दोन लाखापर्यंतची शर्यत भरविण्यात येत असतात. प्रत्येक शर्यत ही चुरशीची होत असल्याने ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते.

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे