शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतून लोकसभेकरिता आर. सी. पाटील उत्सुक काका-पुतण्यात चुरस : भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या घरातून आव्हान

By सुरेश लोखंडे | Updated: February 25, 2018 15:30 IST

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आर.सी.पाटील हे भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे सख्खे काका आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भिवंडी मतदारसंघ जवळचा असल्याने २०१९ च्या निवडणुकीसाठी आर.सी.पाटील हेदेखील इच्छुक आहेत

ठळक मुद्देदोघा काका-पुतण्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन भाजपात स्पर्धा रंगणारलोकसभेच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे. वेळ आल्यावर नक्कीच बोलू. आपल्या शुभेच्छा असून द्या - आर.सी.पाटील* आर.सी. पाटील भाजपात असले तरी ते कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार हे मला माहीत नाही. ते त्यांनाच विचारलेले बरे - खासदार कपिल पाटील.

सुरेश लोखंडेठाणे : एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेले व टीडीसीसी बँकेवर दीर्घकाळ सत्ता उपभोगलेले भिवंडी येथील आर.सी.पाटील व सध्याचे भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील, या दोघा काका-पुतण्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन भाजपात स्पर्धा रंगणार असल्याची चर्चा आहे.भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आर.सी.पाटील हे भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे सख्खे काका आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भिवंडी मतदारसंघ जवळचा असल्याने २०१९ च्या निवडणुकीसाठी आर.सी.पाटील हेदेखील इच्छुक आहेत. आगामी निवडणुकीकरिता भाजपात भिवंडीच्या जागेवरुन काका- पुतण्यातच स्पर्धा रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात आगरी समाज मोठ्या संख्येने आहे. आर.सी.पाटील यांच्या कृपाशीर्वादासह ग्रामीण भागातील भाजपाच्या वर्चस्वामुळे कपिल पाटील हे भिवंडी मतदारसंघात विजयी झाले. याच मतदारसंघात आता उमेदवारी मिळवण्याकरिता आर.सी. पाटील इच्छुक आहेत.ठाणे जिल्ह्यातील भाजपाची सूत्रे ताब्यात दिलेल्या खासदार कपिल पाटील यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील भिवंडी महापालिका व ठाणे जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपाची ताकद जिल्ह्यात कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. शहापूर तालुक्यातील मोठ्या उद्योगाचे प्रमुख असलेला एक उद्योगपती कपिल पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यासोबतही खासदारांचे जिव्हाळ्याचे संबंध नाहीत. तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना सुद्धा कपिल पाटील यांची कार्यपद्धती आवडत नसल्याची चर्चा असून यामुळेच त्यांनी शहापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या विही गावाच्या कार्यक्रमापासून त्यांना दूर ठेवले होते. लागोपाठच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आर.सी. पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे..................

* लोकसभेच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे. वेळ आल्यावर नक्कीच बोलू. आपल्या शुभेच्छा असून द्या- आर.सी.पाटील.................* आर.सी. पाटील भाजपात असले तरी ते कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार हे मला माहीत नाही. ते त्यांनाच विचारलेले बरे- खासदार कपिल पाटील.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार