शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कळव्यात लॉकडाऊन यशस्वी, मुंब्य्रात मात्र समिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 3:13 PM

कळवा आणि मुंब्रा भागात कोरोनाचे १२ रुग्ण आढळल्याने हा भाग मंगळवारपासून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानुसार कळव्यात याला नागरीकांनी प्रतिसाद दिला असला तरी मुंब्य्रातील नागरीकांनी या लॉकडाऊनकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले.

ठाणे : कळव्यात कोरोनाचा १० तर मुंब्य्रात २ रुग्ण सापडले. त्यामुळे मंगळवार पासून कळवा आणि मुंब्रा संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या भागातील मेडीकल दुकाने वगळता इतर सर्वच अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी कळव्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मात्र मुंब्य्रात अत्यावश्यक सेवा बंद असतांनाही रस्त्यावरील नागरीकांची वर्दळ मात्र कमी झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंब्य्रातील नागरीकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले.                       कोरोनाचे केंद्रबिंदू आता कळवाच ठरले असून कळव्यातील विटावा परिसरात कोरोनाचा रु ग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाणे शहरात सर्वाधिक कोरोना पॉसिटीव्ह रु ग्णांची संख्या ही कळव्यात असून ही संख्या आता १० वर जाऊन पोचली आहे. सुरु वातीला पारिसक नगरमध्ये कोरोनाचा पहिला रु ग्ण सापडल्यानंतर हे प्रमाण इतके वाढेल याची कल्पना देखील प्रशासनाला नव्हती. मात्र हा आकडा झपाट्याने वाढत असून आता संपूर्ण कळवाच लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कळव्यात ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाचे रु ग्ण सापडले आहेत त्या इमारती आणि परिसर देखील सील करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये मनिषा नगर, कळव्यातील एक खाजगी हॉस्पिटल, मनीषा नगर मधील एक चाळ आणि इतर काही परिसर सील करण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कळव्यात आजपासून पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले असून त्याला अखेर नागरीकांनी प्रतिसाद दिला आहे. या भागातील अनेक रस्ते मोकळे दिसत होते. फेरीवाले, भाजीवाले, अत्यावश्यक सेवा देणारी किराणा मालाची दुकाने देखील बंद होती.                 दरम्यान कळवा प्रमाणेच मुंब्रा देखील पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे येथील मेडीकल वगळता इतर अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु तरी देखील नागरीक हातात पिशव्या घेऊन रस्त्यावर फिरतांना दिसत होते. तसेच अनेक गल्लीबोळातूनही नागरीकांची तेवढीच वर्दळ दिसत होती. रस्त्यावर वाहने देखील धावतांना दिसत होती. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले असतांनाही नागरीक मात्र घराबाहेर पडतांना दिसत होते. त्यामुळे अजूनही मुंब्य्रातील रहिवाशांना याचे गांभीर्य नसल्याचेच दिसून आले आहे. कळवा, मुंब्रा भागात रस्त्यावर काही कारण नसतांना फिरणाऱ्या वाहनांवर देखील आता जप्तीची कारवाई पोलिसांकडून केली जात आहे.

  •  कळवा आणि मुंब्रा परिसरात भाजी मार्केट, किराणा मालाची दुकाने देखील पूर्णपणे बंद करण्यात आले असून पुढील आदेश मिळेपर्यंत हे भाजी मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात नागरीकांना काही हवे असल्यास त्या वस्तु त्यांना घरपोच देण्यासाठी पालिकेच्या वतीने कळवा आणि मुंब्य्रातील दुकानांची, दुधवाल्याची, भाजी विक्रेत्यांची यादी नंबरसह सोशल मिडियावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर फोन करुन ज्या वस्तु हव्या असतील त्या दिल्या जातील असेही सांगण्यात आले आहे.

 

  • वृदांवन मधील इतर रहिवाशांची चाचणी सुरु

वृंदावन भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता या भागातील ५०० मीटर पर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यानुसार येथील पाच ते सात इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत. आता येथील रहिवाशांची तपासणी देखील पालिकेच्या माध्यमातून सुरु झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाkalwaकळवा