शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधून फेकलेल्या बाटलीने गँगमन जखमी, कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:36 IST

धावत्या लोकलमधून भिरकावलेली काचेची बाटली डोक्यात लागून रेल्वे गँगमनच्या डोक्याला जखम झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. दिलीपकुमार शर्मा (३९, रा. दिवा) असे या गँगमनचे नाव असून त्याला उपचारार्थ कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : धावत्या लोकलमधून भिरकावलेली काचेची बाटली डोक्यात लागून रेल्वे गँगमनच्या डोक्याला जखम झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. दिलीपकुमार शर्मा (३९, रा. दिवा) असे या गँगमनचे नाव असून त्याला उपचारार्थ कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेचा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने निषेध व्यक्त करीत आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान गॅँगमन शर्मा हे इतर १०-१५ सहकाºयांसह रेल्वे रुळालगत काम करीत होते. दुपारी १२.३०च्या सुमारास सीएसटीकडे चाललेल्या धिम्या लोकलच्या एका डब्यातून कोणीतरी भिरकावलेली काचेची बाटली शर्मा यांच्या डोक्याला लागली. त्यामुळे शर्मा यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने ठाणे रेल्वे रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले. धावत्या लोकलमध्ये दारू पिऊन नशेत बाटली फेकली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन महिन्यांपूर्वीच ठाण्यात रु जूजखमी झालेले शर्मा हे दोन महिन्यांपूर्वी बदली होऊन ठाण्यात रुजू झाले होते. त्यापूर्वी ते इगतपुरी येथे गँगमनचे काम करीत होते. धावत्या रेल्वेतून नेमकी कुणी बाटली फेकली ते शोधून काढणे आव्हानात्मक असून बाटली फेकणाºयाने ती हेतूत: गँगमनच्या दिशेने भिरकावली किंवा कसे हे शोधून काढणे अधिकच कठीण आहे.रेल्वे रुळावर काम करताना गँगमनवर थुंकणे, त्यांना लाथ मारणे असे विकृत प्रकार सुरूच आहेत. पण आजच्या घटनेत, थेट बाटली फेकल्याने गँगमन जखमी झाला आहे. हा प्रकार गंभीर आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करीत बाटली फेकणाºयाचा तत्काळ शोध घेऊन त्यास अटक करावी.- एस. बी. महीधर, कार्याध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

टॅग्स :thaneठाणे