शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:49 IST

मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत.

कर्जत : मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत.१ नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेने १६ लोकल फेºया वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये दादर-बदलापूरसाठी दोन, दादर-टिटवाळ्यासाठी दोन, दादर-डोंबिवलीसाठी सहा आणि कुर्ला -कल्याणकरिता सहा या फेºयांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कर्जतसाठी एकही फेरी नसल्याने कर्जतकर प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कर्जत-कल्याण किंवा ठाणे लोकल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली असता रेल्वे प्रशसनाने जोपर्यंत कल्याण ते ठाणे दरम्यान पाचवी व सहावी लाइन्सचे काम होत नाही, तसेच जोपर्यंत कल्याण येथे अतिरिक्त फलाट होत नाही आणि अतिरिक्त लोकल गाड्या उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत तरी कर्जत-कल्याण किंवा ठाणेपर्यंत लोकल गाड्या सुरू करणे रेल्वे प्रशासनास शक्य होणार नाही, असे लेखी उत्तर रेल्वे प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांना दिले आहे.ओसवाल यांनी रेल्वे प्रशासन, कर्जत-कल्याण किंवा ठाणे अशी शटल सेवा असणे किती गरजेचे आहे हे सविस्तरपणे मांडले आहे. काही वर्षांपूर्वी कर्जतकर प्रवासी बदलापूर,अंबरनाथ, कल्याण किंवा ठाण्याला सहज उतरू शकत होता. साधारण दहा वर्षांपूर्वी कर्जतकरांना कल्याण किंवा ठाण्यापर्यंत कधीही जाणे सहज शक्य होते, कारण पूर्वी लोकल गाड्यांना एवढी गर्दी होत नव्हती. परंतु आजच्या घडीला सकाळी गाडीने अंबरनाथ, कल्याण किंवा ठाण्याला जाणे अशक्य होऊन बसले आहे. कारण कर्जत लोकल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत असल्यामुळे, या लोकल गाड्यांमध्ये बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे आदी स्थानकांवर चढणाºया प्रवाशांची एवढी गर्दी असते की कर्जतचा प्रवासी उतरूच शकत नाही. नोकरीनिमित्त रोज जाणाºया प्रवाशांना कल्याण किंवा ठाण्याला उतरताना अक्षरश: जीव मुठीत घेऊनच उतरावे लागते. त्याचप्रमाणे महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा इच्छित स्थळी उतरताना कसरत करावी लागते. काही वेळा विद्यार्थ्यांना पुढच्या स्थानकावर उतरावे लागते. ज्येष्ठ नागरिक किंवा महिला व लहान मुलांना या वेळेस प्रवास करणे शक्यच होत नाही. याबाबतीत कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी कर्जत-कल्याण किंवा ठाणे अशी शटल सेवा सुरू करून कर्जतकरांना होणाºया त्रासापासून मुक्त करावे, अशी विनंती केली आहे. मात्र, नवीन वेळापत्रकात कर्जतसाठी एकही लोकल गाडी न दिल्याने कर्जतकर रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत.आज कर्जतकरांना सकाळच्या वेळेला बदलापूर, अंबरनाथ, कल्याणला उतरणे अवघड झाले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी वरील बाबतीत स्वत: लक्ष घालून कर्जत-कल्याण दरम्यान चालवण्यासाठी लोकल गाड्या उपलब्ध करून द्याव्यात किंवा लवकरात लवकर कर्जत-कल्याण अशी शटल सेवा सुरू करावी, अशी तमाम कर्जतकरांची मागणी आहे.- पंकज ओसवाल,प्रवासी संघ,कर्जत

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्ये रेल्वे