शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:26 IST

मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे.

- अजित मांडकेठाणे : मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा करणे शक्य नसल्याने अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. ज्या भागात वीज देयकांची वसुली कमी आहे, त्या भागांमध्येही भारनियमन सुरू आहे.राज्यात अनेक ठिकाणी महावितरणच्या वतीने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. आॅक्टोबर हीट आणि ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने सुरू केलेल्या अघोषित भारनियमानुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा या भागात सध्या ६ ते ७ तासांचे अघोषित भारनियन सुरु आहे. कल्याण, डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर आदीसह इतर ग्रामीण भागात सध्या अघोषित भारनियमन सुरू आहे. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात तर काही ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात भारनियमन सुरू आहे.आॅक्टोबर हीटमुळे अचानक विजेची मागणी वाढली आहे. त्यात परतीच्या पावसानेसुद्धा हजेरी न लावण्याने शेतकऱ्यांनी पंप सुरु करुन पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे.मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावतसध्या राज्यात विजेची मागणी सुमारे १९५०० मेगावॅट एवढी असून विजेची उपलब्धता सुमारे १६००० ते १७००० मेगावॅट आहे. त्यामुळे दोन हजार ते २ हजार ५०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे.विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने भारनियमन सुरू करावे लागल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.भारनियमनातून शहरी भाग वगळण्यात आला आहे. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत आहे; परंतु वसुली कमी होत आहे, अशा भागात सुरू असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधला गेला, तर भारनियमन बंद होईल, असा दावा महावितरणने केला.

टॅग्स :thaneठाणे