शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तरणतलावाच्या आजीव सदस्यांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:52 IST

डोंबिवली क्रीडासंकुल : सोयी-सुविधांची वानवा, केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

कल्याण : डोंबिवली क्रीडासंकुलातील तरणतलावाच्या सुविधेच्या आजीव सदस्यांची गैरसोय होत आहे. तलावात पोहण्यासाठी अन्य लोकांना सोडले जात असल्याने सदस्यांना या आनंदापासून दूर राहावे लागत आहे. या समस्येबाबत महापालिका मुख्यालयाने लक्ष वेधले आहे; मात्र त्याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप आजीव सदस्य संघटनेचे अध्यक्ष हेमंत वैद्य यांनी केला आहे.डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलात महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव उभारलेला आहे. हा तरणतलाव काही वर्षे कंत्राटदाराकडे दिला होता. त्याच्याकडून देखभाल-दुरुस्ती केली जात नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला. या तरणतलावाचे २०११ मध्ये ५५० जणांनी आजीव सदस्यत्व स्वीकारले. त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये शुल्क भरले आहे. त्यांना क्रीडासंकुलातील सोयी-सुविधा व लाभ मिळणे आवश्यक आहे. या तरणतलावात अन्य मुले व व्यक्तींना पैसे घेऊन पोहण्यासाठी सोडले जाते.

तरणतलावाचा लाभ आजीव सदस्यांना मिळत नाही. तेथे गर्दी दिसून येते. तरणतलावातील लॉकर रूम, पोहून झाल्यावर अंघोळीसाठी असलेल्या वॉशरूममधील शॉवर तुटलेले आहेत. शौचालयाची दुरवस्था झाली असून स्वच्छताही नाही. तसेच ट्यूबलाइटही लागत नाहीत, याकडे अध्यक्ष वैद्य यांनी लक्ष वेधले आहे.

क्रीडासंकुलाबाहेर मोकळे मैदान असून तेथे जॉगिंग ट्रॅक आहे. या ट्रॅकवर रात्री काही मुले बाइकवरून रेसिंग करतात. तसेच, मैदानात असलेल्या प्रेक्षागॅलरीत रात्री अनेक तरुण मद्यपान करतात. याविरोधातही वैद्य यांनी आवाज उठवला आहे. सेवा-सुविधा नाहीत, देखभाल-दुरुस्ती होत नसल्याबाबत २०१५ पासून वैद्य पाठपुरावा करीत आहे. त्याची प्रशासन योग्यप्रकारे दखल घेत नसल्याचा आरोप वैद्य यांनीकेला आहे.

देखभाल-दुरुस्तीबाबत उपअभियंत्याने आरोप फेटाळलेक्रीडासंकुलाची देखभाल-दुरुस्तीचे कामकाज पाहणारे उपअभियंता सचिन मळेकर यांनी वैद्य यांचे आरोप फेटाळले आहेत.मळेकर म्हणाले की, वेळोवेळी दुरुस्ती देखभाल केली जाते. दोन महिने क्रीडासंकुलात लोकसभा निवडणुकीचे कामकाज केले जात होते. तरणतलावाच्या कार्यालयाचा ताबाच निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला होता. २३ मे रोजी मोजणी झाल्यावर संकुल महापालिकेच्या ताब्यात आले. त्यामुळे तेथे अस्वच्छता झाली असावी.

तरण तलावात उन्हाळी शिबिरानिमित्त मुलांना पोहण्यासाठी सोडल्यास त्याचा अर्थ अन्य लोकांना सोडले असा होत नाही. तरण तलवाबाहेर क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्र्क व प्रेक्षा गॅलरीच्या सुरक्षिततेचा विषय सुरक्षारक्षकांचा आहे.