शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डाळींची "मर्यादित साठवणूक"‌ सक्ती व्यापाऱ्यांत भेदभाव करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घाऊक विक्रेत्यांना देशात यापुढे डाळींचा २०० मे टन व किरकोळ विक्रेत्यांना फक्त पाच मे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : घाऊक विक्रेत्यांना देशात यापुढे डाळींचा २०० मे टन व किरकोळ विक्रेत्यांना फक्त पाच मे. टन साठा करता येईल, अशा मर्यादित साठवणुकीचा निर्णय केंद्र ‌शासनाने नुकताच जारी केला आहे. यामुळे या डाळी विक्रेत्यांंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.‌ केंद्राने जारी केलेली अधिसूचना भेदभाव करणारी असून, डाळींच्या व्यापारातील सामान्य व्यवसाय पद्धतीविरुद्ध आहे, असे कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राज्याचे उपाध्यक्ष व ठाणे जिल्हा घाऊक व्यापारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष सुरेश ठक्कर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

डाळींच्या साठवणुकीसाठी निश्चित केलेल्या या मर्यादेची २ जुलैची अधिसूचना मनमानी आणि देशातील व्यापाऱ्यांवर अन्याय करणारी असून, विशेष म्हणजे सरकारच्या स्वत:च्या धोरणाचे उल्लंघन करणारीदेखील आहे, असे ठक्कर म्हणाले. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्याकडे हा मुद्दाही अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) निवेदनाद्वारे उपस्थित करून जारी केलेली अधिसूचना मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र अद्यापही हालचाली दिसून येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोणताही धोरणात्मक मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या '' भागधारकांना विश्वासात घेण्याच्या सल्ल्याचा'' सरळ उल्लंघन करणारी अधिसूचना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील सुमारे पाच लाख लोक अप्रत्यक्षपणे रोजीरोटी मिळवणाऱ्या या डाळींचे देशात वार्षिक उत्पादन २५६ लाख मे टन आहे. या डाळींची आयात सुमारे २० लाख मे. टन आहे.

एका अधिसूचनेद्वारे सरकारने डाळी, मसूर, हरभरा, तूर, उडद, मूग आणि काबली हरभरा या डाळींच्या साठ्याची मर्यादा व्यापारी पोर्टलवर अपलोड केली जाईल, असे आधीच बंधनकारक केले आहे. त्यांचे पालन होत असताना, आता या डाळींच्या साठवणुकीला मर्यादा केल्याचे ते म्हणाले.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने स्पष्टपणे जाहीर केले होते की ''जेव्हा डाळींच्या किमती एमएसपीपेक्षा शून्य टक्के जास्त असतील किंवा देशात आपत्कालीन परिस्थिती असेल, तेव्हाच आवश्यक वस्तू कायदा किंवा स्टॉक मर्यादा लागू होईल'' असे नमूद केलेले आहे. पण ग्राहक व्यवहार मंत्रालयाने २ जुलैला एक अधिसूचना जारी केली होती. त्यात म्हटले होते की '' घाऊक विक्रेते २०० टनच डाळी साठवू शकतात आणि त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या डाळींचा साठा करता येतो, असे नमूद केले आहे. पण आता काढलेल्या अधिसूचनेत डाळी साठवण्यावर मर्यादा घातल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

------ ----