शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

ठाणे जिल्ह्यातील गरीब - कष्टकऱ्यांसाठी आता आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:47 IST

ठाणे : जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागदपत्र वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजी विक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दहा कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटपही ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील तीन लाख ५० हजार कुटुंबियांना या आरोग्य योजनेचा लाभप्रातिनिधिक स्वरूपात दहा कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटपहीजिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ८३ हजार ८९३ तर शहरी भागात दोन लाख ६५ हजार कुटुंबांना या आरोग्य योजनेचा लाभ

ठाणे : जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागदपत्र वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजी विक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दहा कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटपही यावेळी केले. जिल्ह्यातील तीन लाख ५० हजार कुटुंबियांना या आरोग्य योजनेचा लाभ होईल.पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमात अलका धोंगडे, शंकर घोडे, जयेश गोडे, सुमन इतरकर, रु पाली धोंगडे, मानसी भगत, चंद्रकांत साबळे, लक्ष्मी घोडे, सखुबाई आदी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्थ कार्ड देण्यात आले.सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधांसाठी संरक्षण असते, आरोग्य विमा प्रीमियम हप्ते भरणाऱ्यां  लोकांनाही ते मिळते पण गरीब आणि दुर्बल घटकाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर पैशाअभावी त्यांना उपचार मिळू शकत नाहीत. पण आयुष्यमान भारत योजनेमुळे संपूर्ण देश निरोगी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. देशभरातील सरकारी रु ग्णालये या योजनेत सहभागी आहेत. तशीच लवकरच बहुसंख्य खासगी रु ग्णालये देखील यात समाविष्ट करण्यात येतील, असे जावडेकर यांनी याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केले. कथोरे व कपिल पाटील यांनी देखील या योजनेमुळे वैद्यकीय लाभ मोठ्या प्रमाणावर गरिबांना मिळून या क्षेत्रात क्र ांती येईल असे सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले की कोणत्याही शहराचा हैपी इंडेक्स हा केवळ शहरातील इमारती, सुविधा यावर मोजता येत नाही तर तेथील नागरिकांचे आरोग्य कसे आहे यावरही अवलंबून आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही ही त्यांनी दिली.जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ८३ हजार ८९३ तर शहरी भागात दोन लाख ६५ हजार कुटुंबांना या आरोग्य योजनेचा लाभ होईल. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रु ग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच उल्हासनगर येथील रु ग्णालये या योजनेसाठी संलिग्नत करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत एक हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे............. 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी