शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आयुष्यमान भारत योजनेचा ठाण्यात रविवारी शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 03:18 IST

देशभरात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

ठाणे : देशभरात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडणाऱ्या या योजनेच्या शुभारंभाला जावडेकर यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेही उपस्थित असतील. दुपारी १२ वाजता प्रारंभ होणाºया या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना हेल्थकार्डचे वाटप करण्यात येईल, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील साडेतीन लाख कुटुंबांना होणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३, तर शहरी भागातील दोन लाख ६५ हजार कुटुंबांना याचा लाभ होईल, असे योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण मोटे यांनी सांगितले.राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे. यासाठी निकषास अनुसरून निवडलेल्या कुटुंबांना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रुपये विमा संरक्षण राहील. या योजनेंतर्गत त्या कुटुंबांना ठरावीक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. या योजनेमध्ये सुमारे एक हजार १२२ आजारांचा समावेश आहे. यासाठी लाभार्थी कुटुंबांना ई-कार्ड देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रु ग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच उल्हासनगर येथील रूग्णालये संलग्नित केली आहेत.>यांना मिळणार लाभ : आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जातीजमातीचे, दारिद्रयरेषेखालील कुटुंब, भूमिहीन, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीत कच्च्या घरात राहणारे, महिला कुटुंबप्रमुख असलेले यांचा या योजनेत सहभाग आहे. शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्र ी करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लम्बर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकलरिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडंट, हॉटेल वेटर, मेकॅनिक / वीजतंत्री, असेम्ब्ली, दुरु स्ती करणारे, धोबी आणि चौकीदार आदींच्या कुटुंबांना या योजनेत पात्र ठरवण्यात आले आहे.