शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा खून प्रकरणात आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:55 IST

मुंब्रा येथील एका रहिवाशाच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना ठाणे न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात मृताची पत्नी आणि तेरा वर्षीय मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.

ठाणे : मुंब्रा येथील एका रहिवाशाच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना ठाणे न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात मृताची पत्नी आणि तेरा वर्षीय मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.कौसा-मुंब्रा येथील जावेद ऊर्फ जावा नूरअहमद शेख आणि मोहम्मद अस्लम ऊर्फ शेरू मोहम्मद हनीफ शेख ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. त्यांना मुंब्रा येथील आझादनगरात राहणाºया मेहमूद खानची झोपडी चरस, गांजासारख्या अमली पदार्थांच्या धंद्यासाठी हवी होती. अवैध धंद्याकरिता झोपडी वापरण्यासाठी देण्यास मेहमूद खान यांनी आरोपींना विरोध दर्शवला. त्याचा राग येऊन दोन्ही आरोपींनी चारपाच साथीदारांच्या मदतीने मेहमूद खानवर प्राणघातक हल्ला चढवला. घराच्या बाहेर खेचून चाकू आणि तलवारीने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात मेहमूद खानचा मृत्यू झाला. त्याची पत्नी समिना मेहमूद खानच्या तक्रारीवरून शीळ-डायघर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी या प्रकरणाचा तपास केला. सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. आरोपींचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.मुलीची साक्ष महत्त्वपूर्णआरोपींनी मेहमूद खानला घरातून खेचून काढून त्याचा खून केला. त्याची पत्नी समिना आणि १३ वर्षांची मुलगी याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने स्वत:चे कपडे जाळले होते. हा पुरावाही महत्त्वाचा ठरला.