शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

हे जीवन सुंदर आहे... हसा, खेळा आणि मजेत रहा

By admin | Updated: February 6, 2017 04:13 IST

आयुष्य खूप सुंदर आहे. ते केवळ परीक्षेच्या गुणांत-मार्कांत बंद करू नका.

प्रज्ञा म्हात्रे , पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)आयुष्य खूप सुंदर आहे. ते केवळ परीक्षेच्या गुणांत-मार्कांत बंद करू नका. आयुष्यापेक्षा परीक्षेचे गुण महत्त्वाचे नाहीत. सचिन तेंडुलकर बारावी नापास आहे, पण आज तो भारतरत्न आहे. तुम्ही माणूस म्हणून चांगले की वाईट, हे शाळेची परीक्षा ठरवत नाही... अभिनेते सुबोध भावे यांनी युवकांना सल्ला देत होते आणि त्यांच्या साथीने सुरू होता युवा प्रतिभेचा शोध.निमित्त होते, साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपात ‘शोध युवा प्रतिभेचा’ अर्थात ‘आम्हाला काही सांगायचंय’ या चर्चासत्राचे.साहित्य संमेलन, नाट्य संमेलन म्हटले की, सर्वाधिक संख्येने असते ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने या साहित्य संमेलनातील हा समज खोटा ठरवला. मराठी भाषा, साहित्य पुढे नेण्यासाठी आजची युवा पिढी सक्षम आहे आणि ते मराठी भाषेला नक्कीच चांगल्या ठिकाणी नेतील, असा विश्वास देत सुबोध भावे यांनी सहज संवाद साधला. इथे तुमची वार्षिक परीक्षा नाही, असा दिलासा देत त्यांनी युवा प्रतिभा फुलवण्यास मदत केली. साहित्य, शब्द म्हणजे आनंदोत्सव. त्यात परीक्षा नसते. साहित्य माणूसपण शोधायला शिकवते. ते कधी कोणाला कमी लेखत नाही. इतरांची भाषा आपण समजून घेऊ, तेव्हा तेही आपली मराठी आत्मसात करतील, असे त्यांनी सुचवले.तेव्हा खरे टिळक कळले!‘लोकमान्य टिळक’ चित्रपट करताना जेव्हा त्यांच्यावरील पुस्तकांचे वाचन केले, तेव्हा लक्षात आले शाळेत असताना आपल्याला टिळक किती शिकवले ते! शाळेतील विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रीय पुरुषांची किती किंमत असते? फक्त दोन मार्कांची. जोड्या लावा आणि गाळलेल्या जागा भरा. ती व्यक्ती आपल्याला शाळेत शिकवण्याचा प्रयत्न करीत नाही किंवा आपणही त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.दरी निर्माण करणाऱ्यांचा निषेधआजूबाजूला दहशतवादी बनवणारे साहित्य खूप आहे, पण आपल्याला माणूस बनवणारे साहित्य शोधायचे आहे. गटातटांचे राजकारण सुरू असले, तरी नाटक माणसाच्या चारही बाजू समोर आणते. माणसात दरी निर्माण करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो. साहित्याने मला माणसावर टीका करायला नव्हे, राष्ट्रपुरुषांवर, देशावर प्रेम करायला शिकवले, अशी भूमिका भावे यांनी मांडली.सहभागी युवकांनी या वेळी मराठी भाषेविषयीचे प्रेम मांडले. आपण नेहमी आईच्या कविता वाचतो, पण कवितांत वडील हरवलेले असतात, अशी खंत एका विद्यार्थ्याने मांडली. चित्रपटांत आईची भूूमिका चांगली, पण वडिलांची नकारात्मक असते. ते कधी मारझोड करणारे, तर कधी बायकोचा गुलाम असतात. साहित्यात वडिलांनाही महत्त्व हवे, असे मत त्याने मांडले. निकिता टेंबे या विद्यार्थिनीने इंटरनेट या विषयावर कविता सादर केली. सागर महाजन याने साहित्याकडील तरुणाईच्या दुर्लक्षावर प्रकाश टाकला. भावे यांच्या हस्ते ‘हार्मोनिअम’ आणि ‘घेई छंद’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. या वेळी नेहा वैशंपायन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. के.वि. पेंढरकर, आदर्श, मॉडेल, साउथ इंडियन, के.एम. अग्रवाल, वंदे मातरम्, प्रगती, ग्लोबल, मंजुनाथ, बिर्ला, स्वयंसिद्धी या महाविद्यालयांतील युवकयुवतींचा यात सहभाग होता.