शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परवान्यांची खिरापत आली मुळावर! वाहतूककोंडीत पडतेय भर, व्यवसाय होतोय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 00:13 IST

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात आजमितीला रिक्षांची संख्या तब्बल ४० हजारांच्या आसपास आहे. यातील निम्म्या रिक्षा कल्याण-डोंबिवलीत आहेत.

कल्याण : परवानावाटपामुळे रिक्षांची वाढलेली संख्या पाहता परवाने वाटप त्वरित बंद करण्याची मागणी सातत्याने होत आहे; पण राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. रिक्षांची संख्या वाढून स्पर्धा वाढल्याने त्याचा फटका व्यवसायाला बसला आहे. परवान्यांची खिरापत रिक्षा व्यवसायाच्या मुळावर आली आहे. परिणामी, बेरोजगारीचे संकटही रिक्षाचालकांवर ओढवले आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात आजमितीला रिक्षांची संख्या तब्बल ४० हजारांच्या आसपास आहे. यातील निम्म्या रिक्षा कल्याण-डोंबिवलीत आहेत. सरसकट परवाने दिले जात असल्याने रिक्षांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पार्क करायलाही जागा उरलेली नाही. परिणामी, रिक्षास्टॅण्ड, रस्ते, पार्किंग, वाहतूक व्यवस्था, वाहतूक पोलीस यंत्रणा आणि पायाभूत सोयीसुविधा यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण पडत आहे. ज्या ठिकाणी पूर्वी दोन ते तीन रिक्षा उभ्या असायच्या, तेथे आता १० ते १२ रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढून रिक्षाचालकांचा व्यवसाय कमी झाला आहे. एकीकडे भाडेदरवाढीसंदर्भात कोणताही निर्णय सरकारकडून घेतला जात नसताना परवानेवाटप सुरूच असल्याने बेरोजगारीचे संकट ओढावल्याची भावना रिक्षाचालकांतून व्यक्त होत आहे. सरसकट परवानेवाटप सुरू असल्याने रिक्षा परवाना घेऊनही दुसरा व्यवसाय करणारेही अनेक जण आहेत. यात १५ ते १६ वयोगटातील मुलांच्या हातात रिक्षांचे स्टिअरिंग जात असल्याने प्रवासही धोक्याचा झाला आहे. दिवसागणिक वाढत जाणारी रिक्षा-टॅक्सींची संख्या पाहता परवानेवाटप विनाविलंब बंद करा, अन्यथा त्याला पाच ते दहा वर्षे स्थगिती द्या, अशी मागणी सातत्याने होत आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे यासंदर्भात रिक्षा संघटनांनी निवेदनही दिले होते; पण त्या वेळी कोणताच निर्णय घेतला गेला नाही.रिक्षा संघटनेने घेतली परिवहनमंत्र्यांची भेटमहाराष्ट्र रिक्षाचालक सेना कल्याण या संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक रमेश जाधव यांच्यासह संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना परवाना बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. मुक्त परवाने धोरणाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर वाढल्यामुळे यावर तातडीने निर्णय घ्यावा आणि रिक्षाचालकांची उपासमारीतून सुटका करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. आता परब यांच्याकडून तरी परवाना बंद करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेऊन रिक्षाचालकांना दिलासा मिळतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.