शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चला धावू या... स्मार्ट ठाण्यासाठी, महापौर मॅरेथॉनसाठी ठाणेनगरी सज्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:48 IST

अनेक वर्षांपासून क्र ीडा क्षेत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवारी होत असून अनेक नामवंत राष्ट्रीय धावपटूंसह जवळपास २० हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

ठाणे : अनेक वर्षांपासून क्र ीडा क्षेत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवारी होत असून अनेक नामवंत राष्ट्रीय धावपटूंसह जवळपास २० हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. ठाणेकरांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले आहे. ‘चला धावू या स्मार्ट ठाण्यासाठी’, या घोषवाक्यासह हजारो स्पर्धक रविवारी सकाळी ६.३० वाजता स्मार्ट ठाण्यासाठी धावणार आहेत.महापालिका मुख्यालय चौकातून या २८ व्या मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरु वात होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक समारंभ होणार आहे. या वेळी खा. राजन विचारे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अ‍ॅड. निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महाराष्टÑ हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षापासून या मॅरेथॉनमध्ये २१ किमी पुरु ष गट आणि १५ किमी महिला गट या दोन मुख्य स्पर्धेतील धावपटूंना टाइम चीप देण्यास सुरुवात झाल्याने अनेक राष्ट्रीय धावपटू या मॅरेथॉनमध्ये भाग घेतात.आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा सहभागया मॅरेथॉनसाठी २०१९ मध्ये होणाºया कॉमनवेल्थमध्ये कराटेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय कराटेपटू संध्या शेट्टी उपस्थित राहणार आहे. तर, या मॅरेथॉनमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्र ीडापटू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये नाशिक येथून रिशू सिंग, आरती पाटील या महिला खेळाडू व नरेंद्र प्रताप आणि पिंटू यादव आदी खेळाडूंचा समावेश आहे.