शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पोस्टर कोणीही लावू द्या, काम फक्त शिवसेनाच करते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

कल्याण : केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापन कर लागू करून त्याची वसुली सुरू केल्याने भाजपने पालकमंत्र्यांना लक्ष्य करीत पोस्टरबाजी केली होती. ...

कल्याण : केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापन कर लागू करून त्याची वसुली सुरू केल्याने भाजपने पालकमंत्र्यांना लक्ष्य करीत पोस्टरबाजी केली होती. त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, पोस्टर कुणीही लावू द्यात, काम फक्त शिवसेना करते. केलेले काम छाती ठोकून सांगण्याची धमक ठेवते, असा टोला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना, त्यांचा नामोल्लेख न करता लगावला आहे.

खा. शिंदे म्हणाले, कोरोना काळात कल्याण, डोंबिवली तसेच लोकसभा मतदारसंघात कोविड जंबो रुग्णालये उभारली, टेस्टिंग लॅब सुरू केली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५० लाखांचा निधी दिला आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मनपास १७ कोटींचा निधी नगरविकास खात्याकडून प्राप्त झाला. लोकांचा जीव वाचविण्यासाठी हे सगळे केले आहे. त्याचबरोबर कल्याणचा पत्रीपूल, दुर्गाडी खाडीवरील पुलाच्या दोन लेन नुकत्याच सुरू केलेल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, कल्याण-दुर्गाडी ते टिटवाळा हा रिंगरोड प्रकल्पाचा टप्पा ७० टक्के पूर्ण झाला आहे. तिसऱ्या टप्प्याच्या निविदेसाठी ८० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्याची निविदाही काढली जाणार आहे. याशिवाय मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली पुलाचे काम पूर्ण केले जात आहे. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांसाठी ११० कोटींचा निधी आणि कल्याण-डोंबिवलीसाठी १५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे कोणी केली हे लोकांना चांगले माहिती आहे. लोकांना कामे झाल्याशी मतलब आहे. शिवसेना ही केवळ आणि केवळ विकास कामे करते. पोस्टरबाजी करणाऱ्यांनी ती खुशाल करावी. आम्ही काम ३६५ दिवस काम करतो. ते काम आम्ही करत राहणार, असा निर्धारही शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

कल्याण-शीळचे काम अंतिम टप्प्यात

कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा पुलाचे काम मार्गी लागणार आहे. या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जवळपास निकाली निघणार आहे, असे खा. शिंदे म्हणाले.

------------