शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:21 IST

जिल्हा कार्यकारीणीच्या नवीन नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी पसरली असताना त्याचे सावट सोमवारच्या लोकसंवाद कार्यक्रमावरही होते.

डोंबिवली : जिल्हा कार्यकारीणीच्या नवीन नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी पसरली असताना त्याचे सावट सोमवारच्या लोकसंवाद कार्यक्रमावरही होते. या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाकडे तरुण कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या एकूणच वातावरणाबाबत वक्त्यांनीही खडेबोल सुनावले.डोंबिवलीतील केडीएमसीच्या विभागीय कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान हा कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रदेश प्रवक्ते आणि लोकसंवादचे प्रदेश मुख्य समन्वयक विकास लवांडे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आणि पत्रकार विजय राऊत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे डोंबिवली शहर विधानसभा क्षेत्र माजी उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर यांनी केले होते. तरुण कार्यकर्ते व अचलकर यांच्या सहकाºयांनीही या कार्यक्रमाला नाराजीमुळे उपस्थित न राहणे पसंत केले.जिल्हाध्यक्ष हनुमंते, सारीका गायकवाड, राजेश शिंदे, संदीप देसाई, मनोज नायर, उमेश बोरगावकर या आजी-माजी पदाधिकाºयांसह काही मोजक्याच मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थित लावली होती.सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. यावर सुटीच्या दिवशी कार्यक्रम नव्हता. त्यात पक्षामध्ये बहुतांश नोकरदार वर्ग आहे, त्यामुळे सर्वांनाच सोमवारच्या लोकसंवादाला उपस्थित राहता आले नाही, अशी सारवासारव उपस्थित पदाधिकाºयांनी केली.दरम्यान, मतभेद असावेत, पण मनभेद असू नये, मन जुळली पाहिजेत, अन्यथा कितीही प्रशिक्षणे दिली तरी काही फायदा होणार नाही. पद आपल्याला मोठे करीत नाही तर आपल्या कामामुळे पद मोठे होते, असे काम करा की पक्षाकडून तुमची दखल घेतली गेली पाहिजे, नियुक्त्यांवर काही जण बोलणारच, पण एकमेकांचे पाय ओढू नका पक्षवाढीसाठी काम करा, अशा शब्दांत वक्ते विकास लवांडे यांनी खडेबोल उपस्थितांना सुनावले.>भाजपा सरकारवर खरपूस टीकाभाजपाला संसदीय लोकशाही मान्य नाही, ते अध्यक्षीय लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. ज्यांनी आयुष्यभर नथुराम गोडसेंची पूजा केली त्या भाजपाने गांधींना हायजॅक केले आहे, तर पंडित नेहरूंना खलनायक बनविले जात आहे. विकासाची कोणतेही मुद्दे दाखविता येत नसल्याने राममंदिराचा मुद्दा पुन्हा उचलण्यात आला आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना याबाबत कायदा कसा होऊ शकतो, असा टोला या वेळी वक्ते विकास लवांडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला.