शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेबंधूंची संमेलनाकडे पाठ

By admin | Updated: February 6, 2017 04:42 IST

मराठी भाषाभिमानाचे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे आम्हीच ठेकेदार असल्याचा दावा करणारे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण

पु.भा. भावे साहित्यनगरी, (डोंबिवली) : मराठी भाषाभिमानाचे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे आम्हीच ठेकेदार असल्याचा दावा करणारे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाकडे चक्क पाठ फिरवली. राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने हे दोघे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. भाजपाच्या नेत्यांनी नेमकी हीच संधी साधत संमेलन हायजॅक केले.मराठी भाषा आणि मराठी माणसाचे राजकारण हा शिवसेना व मनसेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते, तर संमेलनाच्या समारोप सत्राला उद्धव ठाकरे यांना हजर राहण्याचे निमंत्रण दिले होते. दोघांनीही कार्यक्रमांना दांडी मारली. राज्यात महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले आहे, तर मनसे अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्यामुळे ठाकरेबंधूंनी संमेलनाला येण्याचे टाळले. युती तुटल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांसोबत व्यासपीठावर एकत्र येण्याचे टाळले असले, तरी संमेलनाचे व्यासपीठ हे बिगर राजकीय आहे. राजकारणातील मतभेद व्यक्त करण्याचे हे ठिकाण नाही, असे मत एका साहित्यिकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केले. नेमकी हीच संधी साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी अनुक्रमे उद्घाटन व समारोप कार्यक्रमाला हजेरी लावून भाजपाचा संमेलनावरील वरचष्मा सिद्ध केला.उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीपेक्षा जास्त खटकली, ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरहजेरी. डोंबिवलीमधील हे संमेलन भाजपाने हायजॅक केल्याची ओरड शिवसेना सुरुवातीपासून करत होती. मात्र, जेव्हा हजर राहून हे संमेलन केवळ भाजपाने आपल्याकडे खेचलेले नाही, हे दाखवून देण्याची संधी आली, तेव्हा शिंदे हजर राहिले नाहीत. शिंदे हे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण शिवसैनिक देत होते. मात्र, त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही संमेलनाकडे दुर्लक्ष केले. डोंबिवलीतील शिवसेनेची संमेलनाबाबत अनास्था एवढी भीषण होती की, मातब्बर साहित्यिक, रसिक व हजारो विद्यार्थी ग्रंथदिंडी घेऊन निघाले, तेव्हा शिवसेना शाखेपाशी ग्रंथदिंडीचे स्वागत करायलाही कुणी हजर नव्हते. एकदोन शिवसैनिकांनी तर आम्ही मराठीप्रेमी असल्याचे सांगायला लाज वाटते, इतकी उदासीनता आमच्या पक्षाने संमेलनाबाबत दाखवली, असे खासगीत कबूल केले. (विशेष प्रतिनिधी)